तरुण भारत

देशात 10,584 नवे बाधित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 10 हजार 584 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 78 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 10 लाख 16 हजार 434 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 463 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 17 लाख 45 हजार 552 लोकांना लस देण्यात आली आहे.

सोमवारी 13,255 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 07 लाख 12 हजार 665 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 47 हजार 306 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

देशात आतापर्यंत 21 कोटी 22 लाख 30 हजार 431 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 78 हजार 685 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.22) करण्यात आल्या. 

Related Stories

हिमाचल प्रदेश : दरीत कोसळली एचआरटीसी बस; 6 जण गंभीर जखमी

pradnya p

जानेवारी महिन्यात निर्यातीत वाढ

Patil_p

पाकिस्तानच्या कराचीत गणेशोत्सव साजरा

Patil_p

अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

देशात 36,604 बाधित, 501 मृत्यू

datta jadhav

‘गांधी’गिरीवर पुन्हा लेटरबॉम्ब

Patil_p
error: Content is protected !!