तरुण भारत

विणकर कामगारांचे धरणे आंदोलन

आम्हालाही पॅकेज द्या : बांधकाम कामगारांप्रमाणे सवलती द्या : दिले विविध मागण्यांचे निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

विणकर कामगार असंघटित कामगार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा कामगारवर्ग सर्व सरकारी योजनांपासून वंचित आहे. विणकर कामगाराला कोरोना काळात जीवन जगणे कठीण झाले असून बांधकाम कामगारांप्रमाणेच विणकर कामगारांसाठी कल्याण मंडळाची स्थापना करावी, अशी मागणी विणकर कामगारांनी केली आहे. सोमवारी यासाठी धरणे धरून त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

राज्यामध्ये मोठय़ा प्रमाणात विणकर व्यावसायिक आहेत. याचबरोबर कामगारही मोठय़ा संख्येने आहेत. बेळगाव जिह्यामध्येही हा कामगारवर्ग मोठा आहे. मात्र, या कामगारांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. केवळ रोजंदारीवर हा कामगार काम करत असतो. त्याला कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत. असंघटित असल्यामुळे या कामगारांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा इतरांप्रमाणे आम्हालाही सोयी- सुविधा उपलब्ध करा, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

कोरोनामुळे साऱयांचेच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे कामगारवर्ग अडचणीत आला आहे. मुलांना शिक्षणाची सोय नाही. कोणताही आजार झाला तर उपचार नाहीत. निवृत्त झाल्यानंतर पुढे कोणत्याच सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे जीवन जगणे असहय़ झाले आहे. तेव्हा विणकर कामगारांसाठीही कल्याण मंडळ स्थापन करून सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शंकर ढवळी, रवी पाटील, विठ्ठल बंगोडी, शिवाजी कागणीकर, बसवराज मुरगोड, सिद्धगौडा मोदगी यांच्यासह कामगार उपस्थित होते.

Related Stories

कोरोना बंदोबस्तासाठी येणाऱया पीएसआयचा अपघाती मृत्यू

Patil_p

अकरा वर्षीय बालिकेवर बलात्कार

Rohan_P

कारवार जिल्हय़ातील तलावांचा विकास करा

Amit Kulkarni

शिरगुप्पी साखर कारखान्यातर्फे 2600 रु. दर जाहीर

Patil_p

निकृष्ट दर्जाचे पीपीई कीट ठरत आहेत त्रासदायक

Patil_p

बहीण-भावाचा शेततळय़ात बुडून मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!