तरुण भारत

महाराष्ट्रातून येणाऱयांना चाचणी सक्तीची

आरटी-पीसीआर चाचणीची जिल्हाधिकाऱयांची सूचना : महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा परिणाम

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्रातून येणाऱयांना आरटीपीसीएल चाचणी सक्तीची करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे महाराष्ट्र हद्दीतून येणाऱया सर्व प्रवाशांची ही चाचणी केली जाणार आहे. सर्वांना चाचणी सक्तीची असून यापुढे रुग्ण वाढले तर कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल घेण्याचा विचार सुरू आहे. सध्या सर्वत्र चाचणी केली जात आहे. त्यामुळे सीमाभागातील जनतेला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.

गेल्या सात दिवसांपासून महाराष्ट्रातून प्रवासी किंवा कोणीही आले आहे त्यांची माहिती घेऊन संबंधितांची तपासणी केली जाणार आहे. कोगनोळी नाका, कागवाड, शिनोळी यासह इतर ठिकाणी नाकाबंदी करून त्या ठिकाणी सर्व तपासण्या करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली असून रुग्ण वाढू नयेत याबाबत खबरदारी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या भागामध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळले तर त्याला कन्टेन्मेंट झोन म्हणून पूर्वीसारखेच जाहीर केले जाईल. कोरोनाबाबत पुन्हा जनजागृती केली जाईल. सौंदत्ती, चिंचली, जोगुळभांवीसह इतर यात्रांवर बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.

लग्न समारंभासाठी 200 नातेवाईकांनाच मुभा

लग्न समारंभांवर अद्याप तरी बंदी घालण्यात आली नाही. सर्व प्रकारे त्यांना मुभा देण्यात आली आहे. असे असले तरी लग्न करणाऱया कुटुंबाने 200 पेक्षा अधिक नातेवाईकांना आमंत्रण देऊ नये. जेणेकरून अधिक गर्दी होणार नाही. याची खबरदारी लग्न असलेल्या कुटुंबाने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

जिल्हा प्रशासन लढा देण्यास सज्ज

जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे रुग्ण वाढले तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. बिम्स हॉस्पिटलमध्ये 750 ऑक्सीजन बेड उपलब्ध केले आहेत. याचबरोबर प्रत्येक तालुक्मयामध्ये किमान 30 ऑक्सीजन बेडची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे. आरोग्य विभागाने सर्व ती तयारी केली असून घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ, डॉ. तुक्कार व इतर उपस्थित होते.

 दररोज 2 हजार रुग्णांची तपासणी

आरोग्य विभागातर्फे दररोज दोन हजार रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये केवळ 10 ते 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे हे प्रमाण फार कमी आहे. असे असले तरी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू येथून येणाऱयांवर करडी नजर ठेवली गेली आहे. प्रत्येकाने याबाबत दक्षता घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात फैलाव; कर्नाटक परिवहनला फटका

अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून बससेवादेखील सुरळीतपणे सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने खबरदारी म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवर कोगनोळी टोलनाक्मयावर कोरोना चेकपोस्ट उभारण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढत असला तरी सीमाभागात खबरदारी घेतली जात आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून आंतरजिल्हा बससेवा सुरळीत सुरू आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसेस कर्नाटकात येत आहेत व कर्नाटकातील परिवहन मंडळाच्या बसेस महाराष्ट्राच्या विविध मार्गांवर धावत आहेत. बेळगाव जिल्हय़ाला लागून असलेल्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महाराष्ट्रात धावणाऱया बसेस बंद आहेत की काय अशा संभ्रमात असणाऱया प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दोन्ही राज्यांच्या बससेवा सुरळीत सुरू असून महाराष्ट्रातून कर्नाटकात व कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा सुरू आहे. प्रवाशांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता खबरदारी घेऊन प्रवास करावा, असे आवाहन परिवहनने केले आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटक येणाऱया प्रवाशांना कोरोना प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांना संख्येत घट झाली आहे. विशेषकरून महाराष्ट्रातून सीमाभागात येणाऱया प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे परिवहनच्या महसुलावर परिणाम होणार आहे. सांगली, इचलकरंजी या भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने निपाणी, संकेश्वर, चिकोडी व बेळगाव विभागावर याचा मोठा परिणाम झाला आहे. बेळगाव-चिकोडी विभागाचा निम्मा महसूल हा महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून जमा होत असतो. मात्र, आता कोरोना फैलाव पुन्हा महाराष्ट्रात वाढल्याने याचा फटका चिकोडी, निपाणीसह बेळगाव विभागाला बसत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण सापडत असल्याने सीमाभागातून महाराष्ट्रात जाणाऱया प्रवाशांची संख्या रोडावल्याचे चित्र आहे.

गतवषी कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळासाठी बससेवा बंद होती. परिणामी परिवहनला तब्बल 102 कोटींचा फटका बसला होता. अनलॉकनंतर हळूहळू बससेवा पूर्ववत करून परिवहनचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाने धुमाकूळ घातल्याने परिवहन मंडळ धास्तावले आहे. हळूहळू बससेवा सुरळीत होत असतानाच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्मयता असल्याने परिवहनची चिंता वाढली आहे.

Related Stories

निपाणी-मुरगूड रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम

Omkar B

तालुका म. ए. समितीची बैठक उद्या

Patil_p

कर्नाटकमधील शाळा, महाविद्यालये ३१जुलैपर्यंत बंद राहणार

triratna

गोकाकच्या नगराध्यक्षपदी जयानंद हुनश्याळ

Patil_p

गोडची, वीरभद्र यात्रा साध्या पध्दतीने

Patil_p

बंदच्या पार्श्वभूमिवर शेतकऱयांची बैठक

Patil_p
error: Content is protected !!