तरुण भारत

‘मौज’ दिवाळी अंकाला सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे  आयोजित सर्वोत्तम दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल आज  जाहीर करण्यात आला. 1 लाखाचे पारितोषिक ‘मौज’ या दिवाळी अंकाला जाहीर करण्यात आले.

Advertisements


राजहंस प्रकाशन पुरस्कृत सर्वोत्तम ललीत आणी वैचारिक लेखनासाठी  अरुण खोपकर यांना ‘ दीपावली ‘अंकातील लेखनासाठी जाहीर करण्यात आला.पॉप्युलर प्रकाशन पुरस्कृत सर्वोत्तम कथा पुरस्कार  जयंत पवार यांना ‘पद्मगंधा ‘ अंकातील कथेसाठी जाहीर झाला.वसंत आबाजी डहाके यांना वर्णमुद्रा प्रकाशन पुरस्कृत सर्वोत्तम कविता पुरस्कार ‘उद्याचा मराठवाडा ‘दिवाळी अंकातील कवितेसाठी जाहीर करण्यात आला. हे तिन्ही पुरस्कार प्रत्येकी 11 हजार रुपयांचे आहेत.

पुण्यभूषण फाउंडेशन चे संस्थापक डॉ सतीश देसाई,तसेच संजय भास्कर जोशी, महेंद्र मुंजाळ, वृषाली दाभोळकर यांनी सोमवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
दहा वाचन स्वयंसेवकांच्या प्राथमिक गुणांकनानंतर सदा डुंबरे, हरी नरके, नीरजा, संजय भास्कर जोशी, रेखा इनामदार -साने, नितीन वैद्य यांच्या निवड समितीने सर्व  निवडी केल्या.126 अंक निवड समितीकडे आले होते.


पुण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश देसाई म्हणाले, ‘मराठी अस्मितेचे एक सांस्कृतिक केंद्र अशी मराठी  दिवाळी अंकांच्या शंभराहून अधिक वर्षाच्या परंपरेची ओळख सांगता येईल. अशा या वैभवशाली परंपरेला पुन्हा एकदा देदीप्यमान स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून उत्तमोत्तम दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी  या वर्षापासून पुण्यभूषण फाऊंडेशन तर्फे दर वर्षी सर्वोत्तम दिवाळी अंकास एक लाख रुपये आणि सुवर्णमुद्रांकित प्रशस्तीपत्र असा पुरस्कार देण्याचे ठरवलेे. पुढील किमान 10 वर्षे हा पुरस्कार सातत्याने देण्यात येईल. 

Related Stories

“मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच कोरोना दुसऱ्या लाटेत…” – सोनिया गांधी

Abhijeet Shinde

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वपक्षीयांचे एकमत; मुख्यमंत्र्यांची माहिती

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात मागील 24 तासात 11 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

पाणीटंचाईबाबत प्रस्तावित उपायांची अंमलबजावणी वेळेत करा : अजित पवार

Rohan_P

सोलापूर : बार्शीत आज पाच कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण

Rohan_P
error: Content is protected !!