तरुण भारत

गँगवाडीत साडेपाच किलो गांजा जप्त

मिरज येथील युवकाला अटक : सीसीबीची कारवाई : जप्त गांजाची किंमत दीड लाख रुपये

प्रतिनिधी / बेळगाव

पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीतील सीसीबीच्या अधिकाऱयांनी बेळगावला गांजा पुरविणाऱया मिरज येथील एका युवकाला अटक केली आहे. गँगवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याजवळून साडेपाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी सोमवारी ही कारवाई केली आहे. शब्बीर इब्राहिम पठाण (वय 33) रा. मिरज असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून जप्त गांजाची किंमत दीड लाख रुपये इतकी होते.

शब्बीर हा बेळगाव शहरातील वेगवेगळय़ा किरकोळ विपेत्यांना गांजा पुरवत होता, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. तीन वेगवेगळय़ा पाकिटांमधून त्याने साडेपाच किलो गांजा ठेवला होता. त्याच्याजवळून टीव्हीएस कंपनीची एक स्पोर्ट्स मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.

मिरजहून बेळगावला पुरवठा

केवळ मिरजच नव्हे तर रायबाग, अथणी, बागलकोट, विजापूर जिल्हय़ातूनही बेळगावला गांजा पुरवठा होतो. खासकरून मिरज परिसरातून मोठय़ा प्रमाणात साठा बेळगावला येतो. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी शब्बीर पठाणच्या मुसक्मया आवळल्या आहेत.

शब्बीरवर सीईएन पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त, उपायुक्तांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.

Related Stories

शिक्षकांसाठी आजपासून विषयनिहाय कार्यशाळा

Patil_p

निपाणीत शुकशुकाट, फक्त पाखरांचा किलबिलाट…!

tarunbharat

काकडे फौंडेशनतर्फे समर्थ घाटगेला पुरस्कार

Amit Kulkarni

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद

Amit Kulkarni

कणकुंबीनजीक 63 लिटर मद्य जप्त, एकाची कारागृहात रवानगी

Omkar B

धास्ती कायम, कुडचीत सीलडाऊन कडकच

Patil_p
error: Content is protected !!