तरुण भारत

कोगनोळी नाक्याला पोलीस छावणीचे स्वरुप

कोविड निगेटिव्ह अहवाल आवश्यकच : अथणी तालुक्यात तपासनाक्याची उभारणी : बोरगाव फाटय़ावरही प्रवाशांची तपासणी सुरू

वार्ताहर / कोगनोळी

Advertisements

महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना जर कोविड निगेटिव्ह अहवाल नसेल तर कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. 72 तासांच्या आतील निगेटिव्ह अहवाल वाहनधारकाकडे नसल्यास सीमेवरुन परत पाठविण्यात येत आहे. सोमवारपासून  कर्नाटक शासनाने कडक पावले उचलली असून राष्ट्रीय महामार्गाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मार्च-एप्रिल 2020 मध्ये जशी अवस्था प्राप्त झाली होती. तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र महामार्गावरील कोगनोळी फाटय़ाला व टोलनाक्मयावर दिसून येत आहे. याबरोबरच बोरगाव-इचलकरंजी मार्गावरही तपासनाका उभारण्यात आला आहे. तसेच अथणी तालुक्यातही तपासनाका उभारण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसारच कर्नाटक शासनाच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र- कर्नाटक आंतरराज्य सीमाप्रवेशद्वार असलेल्या कोगनोळी येथून कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱया वाहनांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.

यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने अधिकाऱयांसह जवळपास 50 पोलीस कर्मचाऱयांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. हे कर्मचारी याठिकाणी येणाऱया वाहनधारकांकडे प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत. प्रमाणपत्र नसणाऱया वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव करून परत महाराष्ट्रात पाठवत आहेत. याठिकाणी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, डीवायएसपी मनोजकुमार नाईक, मंडल पोलीस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय बी. एस. तळवार यांच्यासह पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.

बोरगाव : आयको नाक्मयावरही

बोरगाव : गेल्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे प्रवेशद्वार असणाऱया बोरगाव-आयको नाक्मयावर महाराष्ट्रातून येणाऱया सर्व प्रवाशांची तपासणी करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सदलगा पोलीस उपनिरीक्षक आर वाय बिळगी यांनी दिली. येथील बोरगाव-आयको नाक्मयावर तहसीलदार विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, नगर पंचायत विभाग कर्मचारी तैनात करण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आशा कार्यकर्त्या, वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार सदलगा पोलिसांच्या वतीने रविवारी मध्यरात्रीपासून येथील आयकोजवळ नाकाबंदी केली आहे. इचलरकंजीसह विविध ठिकाणांहून येणाऱया प्रवाशांची या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. याठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया सर्व चारचाकी गाडय़ा व इतर वाहने यामध्ये असणारे प्रवासी यांची थर्मल स्क्रीनिंग करून प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे.

लक्षण आढळल्यास परत पाठविणार

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱया प्रवाशांमध्ये जर कोणाला ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्यास त्यांना परत पाठवण्यात येणार असल्याचेही यावेळी पोलीस उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील प्रवाशाने किमान 72 तासांपूर्वी कोरोनाची टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्याधिकारी डॉ. संदेश राउळकेदारी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. हुगार यांच्यासह अन्य उपस्थित होते.

कोगनोळी नाक्मयाला जिल्हाधिकाऱयांची भेट

कोगनोळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथील सीमा तपासणी नाक्मयाला बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सोमवारी सायंकाळी भेट देऊन पाहणी केली. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱया प्रवाशांमुळे कोरोना संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. यामुळे महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांना आरटी-पीसीआर हे निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देऊ नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मंदिरातील धार्मिक विधी करताना गर्दी न करता ते पार पाडावेत व लोकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हापोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, पोलीस उपअधीक्षक मनोजकुमार नाईक, तहसीलदार प्रकाश गायकवाड, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

सातवीच्या पाठय़पुस्तकातून टीपू सुलतानचा धडा वगळला

Patil_p

सिद्धरामय्या कोरोना मुक्त, रुग्णालयातून डिस्चार्ज

Abhijeet Shinde

उद्यानांच्या विकासाकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक कोंडी

Patil_p

खडेबाजारमध्ये दोन वर्षांपासून जलवाहिनीला गळती

Patil_p

महापौर निवड कोणत्या आरक्षणानुसार?

Omkar B
error: Content is protected !!