ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लाल किल्ल्यावर 26 जानेवारीला उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. महिंदर सिंह आणि मनदीप सिंह अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
मोहिंदर सिंह हे जम्मू-काश्मीर युनायटेड फार्मर्स फ्रंटचे अध्यक्ष असून, ते जम्मूतील चंठा येथील रहिवासी आहेत. त्यांना सोमवारी रात्री जम्मूत अटक करून दिल्लीला आणण्यात आले.
26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवल्याचा ठपका ठेवत दिल्ली पोलिसांनी यापूर्वी अभिनेता दीप सिद्धू, महिंदर उर्फ मोनी आणि इक्बाल सिंग यांना अटक केली आहे.