तरुण भारत

कर्नाटक: चिक्कबळ्ळापूरमध्ये जिलेटिन कांड्यांचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू

चिक्कबळ्ळापूर: प्रतिनिधी

कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील हिरेनागावळ्ळी गावात उत्खननस्थळी झालेल्या स्फोटात कमीतकमी सहा लोक ठार झाले. मंगळवारी पहाटे या जिलेटिनच्या कांड्यांच्या स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार जिलेटिनच्या कांड्या वाहनातून जात असताना हा स्फोट झाला. पेरेसंद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत. दरम्यान ते सर्वजण उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएलची एक टीम घटनास्थळी आहे. पेरेसंद्रा पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्फोट हा अत्यंत गंभीर असल्याने ठार झालेल्या मृत व्यक्तीचा मृतदेह ओळखला जाऊ शकत नाही आणि जिलेटिनच्या कांड्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात दु:ख व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी, “कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर येथे झालेल्या दुर्घटनेमुळे जीवितहानी झाली. त्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती मिळो. यात जखमी झालेले लोक लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो.”

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले की, जिलेटिनच्या स्फोटांमुळे चिक्काबल्लापूर गावात हिरेनागावळ्ळी गावाजवळ सहा जणांचा मृत्यू झाला, ही धक्कादायक बाब आहे. जिल्हा प्रभारी मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री आणि जिल्हा प्रभारी डॉ. के सुधाकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ते म्हणाले, “ही एक धक्कादायक घटना आहे. ही सर्व स्फोटकं बेकायदेशीरपणे साठा करून ठेवली होती. या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल.”

Advertisements

Related Stories

लॉकडाउननंतर प्रथमच सिनेमा हाऊसफुल

Abhijeet Shinde

कर्नाटक: कोरोनामुळे ३०० हून अधिक सरकारी कर्मचारी दगावले

Abhijeet Shinde

शेतकरी संघटनेचे आज राज्यव्यापी आंदोलन

Amit Kulkarni

कर्नाटकात ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांमध्ये वाढ

Abhijeet Shinde

बेंगळूरमध्ये आजपासून ड्रोनद्वारे सॅनिटायझिंग

Amit Kulkarni

कोविड रुग्णांसाठी बेड आरक्षित न केल्यास कठोर कारवाई: आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!