तरुण भारत

नाचणीची भजी

आपण कांदा, बटाटय़ाची भजी नेहमीच खातो. तसंच भजी करण्यासाठी बेसनाचं पीठ वापरतो. मात्र तुम्ही नाचणीच्या पीठापासून पौष्टिक भजी तयार करू शकता. नाचणीच्या भजीची रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य : उकडलेले बटाटे दोन कप, एक कप बेसन, नाचणीचं पीठ तीन चमचे, एक चमचा तिखट, एक चमचा तांदळाचं पीठ, तेल, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबिर आणि चवीनुसार मीठ.

 कृती : एका भांडय़ात बेसन, नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ, उकडलेले बटाटे,मिरची, कोथिंबिर, तिखट आणि मीठ असे सगळे घटक एकत्र करून घ्या. थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्या. हे पीठ फार काळ ठेऊ नका. अन्यथा ते पाणी सोडू लागेल. आता एक कढईत थोडं तेल गरम करून घ्या. पीठाचे गोळे करून तेलात सोडा. सोनेरी रंगावर तळून घ्या. सॉस किंवा चटणीसोबत ही भजी खाता येईल.

Related Stories

मुळा बेसन

Omkar B

दही पापडी चाट

Omkar B

आलू मखनी

Omkar B

कस्टर्ड केक

Omkar B

मटण दम बिर्याणी

tarunbharat

मालवणी काजू करी

Omkar B
error: Content is protected !!