तरुण भारत

सोलापूर : बुधवारी माघ द्वादशीलाही विठ्ठलाचे देऊळबंद

तरुण भारत संवाद पंढरपूर / संकेत कुलकर्णी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर माघ शुद्ध द्वादशी अर्थात २४ फेब्रुवारी रोजी पंढरपुरात गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मंदिर समितीने बुधवारी विठ्ठलाचे मुखदर्शन हे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Advertisements

माघ एकादशीच्या निमित्ताने मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी पंढरपुरात संचारबंदीचा अंमल लागू आहे. अशातच माघ द्वादशीला २४ फेब्रुवारी रोजी रोजी भाविकांची गर्दी राहू शकते. असा पोलीस प्रशासनाचा आणि जिल्हा प्रशासनाचा तर्क असल्याने मंदिर समितीकडून २४ फेब्रुवारी रोजी विठ्ठलाचे मुखदर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. माघीच्या निमित्ताने २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मंदिर समितीकडून विठ्ठलाचे मुखदर्शन हे सर्व भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. आता यामध्ये २४ फेब्रुवारी रोजी ही मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद होत असल्याने पंढरपूरातील पोलिसांचा बंदोबस्त देखील गुरुवारी पहाटे पर्यंत राहू शकतो. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Related Stories

सोलापुरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरूवात

Abhijeet Shinde

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शीच्यावतीने ग्राहक प्रबोधन पंधरवडाचे आयोजन

Abhijeet Shinde

करमाळा शहरातील व्यापार्यांचा जनता कर्फ्यूसाठी प्रतिसाद

Abhijeet Shinde

सोलापूर : माढा तालुक्यात नवे ६८ कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

करमाळा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास मंजुरी

Abhijeet Shinde

सोलापूर : मास्क वापरणे हीच लस : ग्रामविकास अधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!