तरुण भारत

दुधाचा त्रास आहे

अनेकांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होतो. याला वैद्यकीय भाषेत ‘लॅक्टॉस इन्टॉलरन्स’ असं म्हणतात. या व्याधीची किंवा समस्येची काही लक्षणं आहेत. या लक्षणांविषयी…

लॅक्टॉस हा नैसर्गिक साखरेचा एक प्रकार आहे. दुधात ही साखर आढळते. लॅक्टेस हे पाचक रसायन लॅक्टॉसचं विघटन करतं. यामुळे लॅक्टॉसचं सुलभपणे पचन होतं. मात्र शरीर पुरेशा प्रमाणात लॅक्टेसची निर्मिती करत नसेल तर लॅक्टॉस पचनात अडथळे निर्माण होतात आणि लॅक्टॉस इन्टॉलरन्सची समस्या निर्माण होते. लॅक्टॉस इन्टॉलरन्स ही   सर्वसामान्य समस्या आहे. जगभरातल्या जवळपास 70 टक्के लोकांना हा त्रास असतो. हायड्रोजन ब्रेथ चाचणीद्वारे या समस्येचं निदान होतं. लॅक्टॉस इन्टॉलरन्सचा त्रास कमी करण्यासाठी दूध तसंच दुग्धजन्य पदार्थांचं सेवन कमी करायला हवं.

लॅक्टॉस इन्टॉलरन्सची लक्षणं

लॅक्टॉस इन्टॉलरन्समुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. बद्धकोष्ठता, पोट फुगणं, पोटावर ताण येणं अशी लक्षणं दिसू लागतात.  पूर्णपणे न पचलेली लॅक्टॉस मोठय़ा आतडय़ात साठते. इथे तिच्या आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळे निर्माण होणार्या मिथेनमुळे पचनशक्तीवर परिणाम होतो आणि परिणामी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अर्थात बद्धकोष्ठतेची इतरही कारणं आहेत. तंतूमय पदार्थांची कमतरता, पाण्याचं कमी प्रमाण यामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बद्धकोष्ठता नेमकी कशामुळे आहे हे जाणून घ्यायला हवं.

लॅक्टॉस इन्टॉलरन्सचा त्रास असणार्या अनेकांना पचनाशी संबधित समस्या जाणवतच नाहीत. त्याऐवजी एक्झेमा, डोकेदुखी, तोंड येणं, थकवा येणं, एकाग्रता कमी होणं, स्नायू, सांधेदुखी, मूत्रमार्गाशी संबंधित समस्या अशी लक्षण दिसून येतात. अर्थात ही लक्षणं इतर व्याधींमुळेही असू शकतात. लॅक्टॉसचा त्रास असेल तर शरीरात गॅस तयार होतो. लॅक्टॉस आंबण्याच्या प्रक्रियेमुळे कार्बन
डाय ऑक्साइड, मिथेन, हायड्रोजन अशा वायूंची निर्मिती होते. हा प्रकार खूपच त्रासदायक असतो. पोट फुगणं तसंच पोटदुखी ही लॅक्टॉस इन्टॉलरन्सशी संबंधित सर्वसामान्य लक्षणं आहेत. लॅक्टॉस   इन्टॉलरन्समुळे मोठय़ा आतडय़ातलं पाण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे शौचही पाण्यासारखं पातळ होतं. जुलाब हे सुद्धा लॅक्टॉसच्या त्रासाचं लक्षण असू शकतं. ही समस्यह प्रौढांच्या तुलनेत लहान बाळांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. लॅक्टॉस आंबण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यातून वायू तसंच शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्सची निर्भिती होते. यापैकी काही आम्लं पुन्हा मोठय़ा आतडय़ात शोषली जातात. ही आम्लं आणि लॅक्टॉस यांच्यामुळे मोठय़ा आतडय़ातल्या पाण्याचं प्रमाण वाढतं

Related Stories

अशा आहेत योजना

Omkar B

मैत्रीलाही हवी मर्यादा

Omkar B

लागवड टामॅटोची

Omkar B

युथफुल दिसण्यासाठी…

Omkar B

आहारतज्ञांकडे जाताय?

Omkar B

उशीराने आई होताना…

Omkar B
error: Content is protected !!