तरुण भारत

कोल्हापूर : आभार फाटा ते शाहूनगर रस्त्याची दुरुस्ती कधी होणार?

अपघातांच्या प्रमाणात वाढ, लोकप्रतिनिधींना कधी जाग येणार?

राकेश पाटील / चंदूर

येथील आभारफाटा ते शाहूनगर मार्गे कलानगर ला जोडणाऱ्या रस्ता गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त आहे. शाहूनगर नजीक रस्त्यावर गटारीचे पाणी मुख्य रस्त्यावर सोडले आहे. त्यामुळे शाहूनगर मधील रस्त्यावर गटारीच्या पाण्याचे डबके बनले आहेत. या रस्त्यावरून विध्यार्थीसह, नागरिकांना वाहतूक करताना जीव मुठीत धरून जावे लागत आहेत. रस्त्यातील खड्डे चुकवताना अनेक अपघात रोज घडत आहे.याबाबत आठ महिन्यापूर्वी शाहूनगर मधील सर्वपक्षीयांनी विद्यमान आमदाराना निवेदन दिले होते. त्यांनीही लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही.

शाहूनगर येथील रस्त्यावरील खड्डे काही महिन्यांपूर्वी एका लोकप्रतिनिधीने बुजवून घेतले होते पण दोन तीन महिने उलटताच रस्त्याची अवस्था पुन्हा बिकट बनली आहे. नागरिकांना आभार फाटा ते कलानगरचे ५ किलोमीटरचे अंतर पार करण्यात सुमारे अर्धा तास लागत आहे. मुख्य मार्गावर कलानगर येथे ड्रेनेजचे काम चालू आहे. त्यामुळे तर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन रस्ताच लवकर पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे

Related Stories

गांधीनगरमध्ये बेकायदेशीररित्या ठेवी जमा करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Shankar_P

कोल्हापूर : राजाराम तलावात सापडला महिलेचा मृतदेह

triratna

इचलकरंजी येथील मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक

triratna

कोल्हापूर : पेठ वडगावच्या कोविड सेंटरसाठी आवश्यक सर्व मदत करू : खासदार माने

triratna

खासबाग परिसरातील अतिक्रमण हटविले

triratna

कोल्हापूरचा सुपूत्र डॉ.अजिक्य भंडारीने बजावले साहशी कोरोना योद्ध्याचे कर्तव्य

Shankar_P
error: Content is protected !!