तरुण भारत

श्रीलंका दौर्‍यासाठी इम्रान खान करणार भारतीय हवाई क्षेत्राचा वापर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय हवाई हद्दीचा वापर करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. इम्रान खान येत्या मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि उच्चस्तरीय व्यावसायिक शिष्टमंडळासह श्रीलंकेच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यासाठी त्यांना भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करावा लागणार आहे.

इम्रान खान श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार असून व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पर्यटनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान राजपक्षे यांच्या निमंत्रणावर इम्रान खान श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहेत.

दरम्यान, 2019 मध्ये पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा भारतावर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका आणि सौदी अरेबियाला जाण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यास परवानगी नाकारली होती.

Related Stories

पाकचाही चीनला दणका; ‘टिकटॉक’वर घातली बंदी

datta jadhav

गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांची आत्महत्या

Patil_p

दिल्लीत 4308 नवे कोरोना रुग्ण, 28 मृत्यू

pradnya p

झारखंडमध्ये आढळला आयईडी बॉम्ब

Patil_p

देशात कोरोनाने वेग वाढवला; 24 तासात 4213 नवे रुग्ण

datta jadhav

जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक

datta jadhav
error: Content is protected !!