तरुण भारत

‘क्लासिकल अँड बियाॅंड’ या सांगीतिक कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने

  • ठुमरी, लोकसंगीत, भजनाला रसिकांची मनमुराद दाद

ऑनलाईन टीम / पुणे :

खयाल, ठुमरी, दादरा, सरगम गीत, टप्पा, बहुभाषिक लोकसंगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत, भजन अशा विविध संगीत प्रकरांसह भावगर्भ अशा व्हायोलीन वादनाचा समावेश असलेल्या ‘क्लासिकल अँड बियाॅंड’ या सांगीतिक कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.

निमित्त होते प्रेरणा संस्था आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मनोहर मंगल कार्यालयात आयोजित ‘क्लासिकल अँड बियाॅंड’ या सांगीतिक कार्यक्रमाचे.

यावेळी प्रेरणा संस्थेतर्फे कै.कॅप्टन शंकर कृष्ण जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा युवा पुरस्कार गुरू सुरेश तळवलकर यांचे शिष्य जगमित्र रामलिंग लिंगाडे, वेदांग वीरेंद्र जोशी, भार्गव व्यंकटेश देशमुख आणि गंगाधार शिंदे, प्रमोद मराठे यांचे शिष्य ऋषीकेश पूजारी, शौनक अभिषेकी यांचे शिष्य विश्वजीत मेस्त्री यांना पंडीत रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी पंडीत रघुनंदन पणशीकर, गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनासह राजस उपाध्ये यांचे एकल व्हायोलीन वादन झाले.

मैफलीच्या प्रारंभी राजस उपाध्ये यांनी व्हायोलीन ‘तेरे सुर और मेरे गीत’, ‘मोह मोह के धागे’ आणि ‘तुही रे’ आणि ‘तुझे कितना चाहने लगे हम’ अशी लोकप्रिय जुनी-नवी गीतांची शास्त्रीय संगीतावर आधारीत मेडली सादर केली. त्यानंतर त्यांनी राग काफी रागामध्ये एक धुन आणि एक तराणा सादर केला.

त्यानंतर प्रेरणा संस्थेच्या संचालिका विदुषी सानिया पाटणकर यांनी राग बसंती केदारने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यानंतर राग देस मध्ये ‘रिमझिम बरसे मेहरवा’ हा टप्पा सादर केला. नंतर दादरा मध्ये ‘छा रही काली घटा’ हे गीत सादर करून त्यांच्या गायनाची सांगता केली.

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात पंडित रघुनंदन पणशीकर यांनी प्रारंभी हंसध्वनी रागातील ‘गणपती विघ्नहर गजानन’ ही मध्यलय तीन तालातील बंदिश सादर केली. त्याचबरोबर हिंदी आणि मराठी भजनांसह ‘गुंतता ह्द्य हे’ हे नाट्यागीत सादर करुन रसिकांची मने जिंकली. राघवेंद्र स्वामी यांनी रचलेल्या कानडी भजनाने कार्यक्रमात अधिक रंगत भरली. तर ‘अवघा रंग एक झाला’ ह्या सुंदर भैरवीने पंडित रघुनंदन पणशीकर यांनी मैफलीची सांगता केली.

Related Stories

बेस्टमधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे पत्र

triratna

महाराष्ट्रात 13 लाख पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

तपासणीसाठी कार थांबविणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

Rohan_P

‘या’ विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही : शरद पवार

pradnya p

पुणे विभागातील 4 लाख 49 हजार 793 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

पुणे विभागातील 5 लाख 76 हजार 44 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p
error: Content is protected !!