तरुण भारत

बेंगळूर: आणखी एका अपार्टमेंटमधील १० जणांना कोरोनाची लागण

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूरमध्ये आणखी एका अपार्टमेंटमधील १० जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान कोरोना चाचणी केल्यांनतर दहा जणांचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर बेंगळुरमधील एका दुसर्‍या अपार्टमेंटमध्ये कोविड -१९ चा सतर्कतेचा इशारा देण्यात आला, अशी माहिती सोमवारी रात्री अधिकाऱ्यांनी दिली.

एसजेआर वॉटरमार्क अपार्टमेंट्समध्ये १५०० लोकांच्या समावेश असलेल्या नऊ ब्लॉक्समधील १० प्रकरणे १५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सापडली, असे बृह बेंगळूर महानगर पालिकेचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी एका निवेदनात म्हटले आहे. महादेवपुरा झोनच्या बेल्लंदूर येथील अपार्टमेंटला बीबीएमपीने कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.

उर्वरित तीन ब्लॉक्स २०० मीटर अंतरावर आहेत आणि इथे अद्याप कोणतीही पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेलेली नाहीत, असे बीबीएमपीने सांगितले. आयुक्त प्रसाद यांनी सोमवारी नऊ मोबाईल पथके तैनात करण्यात आली होती आणि ५०० ​​आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले आणि त्याचा निकाल आजपर्यंत अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. तसेच सर्वत्र सॅनिटायझेशन केले गेले आहे आणि या ठिकाणी सामाजिक-दूरवर उपाय लागू केले जात आहेत.

यापूर्वी, बेंगळूरच्या बोम्मनहळ्ळी तील एक अपार्टमेंट १०३ लोकांना संसर्गित झाल्यावर कोविड हॉटस्पॉट बनले होते. अपार्टमेंटमधील १०५२ रहिवाशांपैकी १०३ नागरिकांना पार्टीनंतर कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

कर्नाटक: वीज दरवाढीमुळे अनेक उद्योग बंद होतील: एफकेसीसीआय

Shankar_P

बससेवा आज सुरू राहणार

Patil_p

बेंगळूर: पोटनिवडणुकीसाठी सशस्त्र सैन्य दल तैनात

triratna

‘या’ वयोगटासाठी मार्चपासून लसीकरण

triratna

मधमाश्यांची खोकी असणारे कुंपण रोखणार हत्ती-मानव संघर्ष

Amit Kulkarni

कर्नाटक : पी. रवी कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव

triratna
error: Content is protected !!