तरुण भारत

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर

महापौर पदी दिग्विजय सूर्यवंशी; उपमहापौर पदी उमेश पाटील

प्रतिनिधी / सांगली

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत अखेर भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला आहे. भाजपचे सात सदस्य आघाडीच्या गळाला लागले. त्यापैकी ५ सदस्यांनी थेट काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. तर दोन सदस्य गैरहजर राहिले. महापौर पदी आघाडीचे दिग्विजय सूर्यवंशी व उपमहापौर पदी उमेश पाटील यांची निवड झाली. दोघांना ३९ मते मिळाली. सूर्यवंशी हे महापालिकेचे १५ वे महापौर ठरले आहेत.

भाजपचे स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, अपर्णा कदम, नासीमा नाईक व विजय घाडगे यांनी थेट आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. तर उपमहापौर आनंदा देवमाने, नगरसेवक शिवाजी दुर्वे हे गैरहजर राहिले. भाजपचे सात सदस्य फुटले. परिणामी भाजपला वर्षात सत्ता सोडावी लागली.

उपमहापौर उमेश पाटील

Related Stories

सांगली : जाडरबोबलाद लिंगायत स्मशान भुमीतील पत्र्याचे शेड गायब; चौकशीची मागणी

triratna

शिपूर मारहाण प्रकरणी सात जणांच्यावर गुन्हा दाखल

Shankar_P

सांगलीत गुरूनानक यांना अभिवादन

triratna

सांगली : कडेगावात धडकले भगवे वादळ

triratna

सांगली : चांदोली धरणातून 4400 क्युसेक विसर्ग

Shankar_P

मिरजेत रस्त्यांवरील बेवारस वाहनांचा कचरा साफ

triratna
error: Content is protected !!