ऑनलाईन टीम / रियाध :
महिलांना मर्यादित हक्क देणाऱ्या सौदी अरेबियाने आता महिलांना तिन्ही सैन्य दलाची दारे खुली केली आहेत. त्यामुळे तेथील महिलांना रॉयल आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये भरती होता येणार आहे. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
क्राऊन प्रिन्स मोहमद सलमान यांनी दूरदृष्टीतून सौदीने महिलांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सैन्यदलात भरती होणाऱ्या महिलांनी माध्यमिक शिक्षणपूर्ण केलेले असावे. त्यांचा वयोगट 21 ते 40 पर्यंत असावा. उंची 155 सेंटीमीटर असणेअनिवार्य आहे. तसेच त्यांनी परदेशी व्यक्तीशी विवाह केलेला नसावा, अशी अट आहे.
प्रिन्स मोहमद सलमान यांच्याकडून येत्या काळात महिलांवरील निर्बंध मर्यादीत करणारे कायदे आणखी शिथिल केले जाण्याची शक्यता आहे.