तरुण भारत

सातारा : जिल्ह्यात विविध ठिकाणांहून चार दुचाकी लंपास

सातारा : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. चोरटे देखील पोलिसांना सापडत आहेत. मात्र, दुचाकी चोऱ्या थांबलेल्या नाहीत. जिल्ह्यात विविध चार ठिकाणांहून चार दुचाकी चोरुन नेल्याच्या घटना घडल्या असून, एकूण 1 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या या दुचाकी आहेत. या दुचाकी चोरट्यांना कधी लगाम बसणार असा सवाल नागरिकांना पडला आहे.

पहिल्या घटनेत दि. 22 रोजी तासवडे, ता. कराड एमआयडीसीत पीडी लाईट कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली 30 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची दुचाकी अज्ञात चोरटय़ाने लंपास केली. याबाबत गणेश रमेश चव्हाण (वय 31, रा. जैतापूर, ता. सातारा) यांनी तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय.  दुसऱ्या घटनेत रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे बेकरीच्यासमोर पार्क केलेली 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक एम. एच. 11 सीई 0886 ही अज्ञाताने चोरुन नेली. याबाबत अजिंक्य राजेंद्र देशमुख (वय 29, रा. नांदगाव, ता. सातारा) यांनी दि. 22 रोजी रहिमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय.

तिसऱ्या घटनेत शिंगणापूर, ता. माण येथे शंभू महादेवाच्या मंदिराच्या पारिसरात पार्क केलेली 35 हजार रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर कंपनीची दुचाकी क्रमांक एम. एच. 11 बी. डब्ल्यू. 4980 ही अज्ञाताने चोरुन नेली. याबाबत अरुण बापू भोसले (वय 27, रा. शिंगणापूर) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  

बावधन ओढा, ता. वाई येथे घरासमोर लावलेली 50 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एम. एच. 11 बीसी 7972 ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत सौरभ कृष्णा देवकाते (वय 23, रा. बावधन ओढा) याने वाई पोलास ठाण्यात तक्रार दिली आहे. एकाच दिवशी दाखल झालेल्या या चार दुचाकी चोऱ्यांचा तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

आरोग्य विभागाच्या प्रमुखपदावर आता स्थावरचे सुहास पवार

Patil_p

किल्ले अजिंक्यताऱ्याचा मार्ग होणार प्रकाशमान

Patil_p

गौरी आणि घरगुती बाप्पांचे विसर्जन

Patil_p

सातारा : शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे पालन करुन नूतन वर्षाचे स्वागत करावे

triratna

डेरवणमध्ये आढळली रानमांजराची पिल्ले

Patil_p

यवतेश्वर घाटात बिबटय़ाचे दर्शन

Patil_p
error: Content is protected !!