तरुण भारत

सातारा : कोरोना चाचणी करण्यास गेलेल्या पथकास दमदाटी

जावली तालुक्यातील प्रकार : दोघांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा  

प्रतिनिधी / सातारा : 

आरडे, ता. जावली येथील एका घरातील मुलीचा कोरोना अहवाल बाधित आला असल्याने तिची तपासणी करण्याबरोबरच तिच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यास गेलेल्या सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांना मारण्याच्या उद्देशाने धावून जात शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जोतिराम नामदेव ससाणे व संजय राजाराम शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि. 22 रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान, सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अजय विजय वाडते हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत आरडे, ता. जावली येथे गेले होते. तिथे एका घरातील मुलगी बाधित आली असून तिची तपासणी तसेच तिच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याबाबत ते सांगत होते.

त्यावेळी जोतिराम ससाणे व संजय शिंदे यांनी आमच्या घरातील लोकांची टेस्ट करायची नाही. सकाळपासून चार वेळा येताय, आमची मुलगी मेली तरी तुम्हाला काही एक फरक पडणार नाही असे म्हणत वाडते यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर मारण्याच्या उद्देशाने हे धावून जात होते. यावेळी त्यांनी शिवीगाळ केल्याने या दोघांविरुध्द मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार डी. जी. शिंदे करत आहेत.

Related Stories

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आज मांडणार 307 कोटींच बजेट

Amit Kulkarni

मोकाट कुत्र्यांचा चिमुरडीवर हल्ला

Patil_p

सातारा : लक्ष्मी टेकडीवरील घरकुलात सुविधाचा अभाव

triratna

सातारा जिल्ह्यात १४३ कोरोनाबाधित, तिघांचा मृत्यू

Shankar_P

कोरोना रक्षकांना वार्‍यावर सोडणार नाही : प्रभाकर घार्गे

triratna

मेढय़ातन सुरु झाल अन् वाढय़ात संपल

Patil_p
error: Content is protected !!