तरुण भारत

‘सिंपलीलर्न’च्या विद्यार्थ्यांची संख्या तीन वर्षात दुप्पट

ऑनलाईन टीम / बेंगळूर :

डिजिटल कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रगण्य असलेल्या ‘सिंपलीलर्न’ या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर 20 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याचे या कंपनीतर्फे घोषित करण्यात आले. 2010 मध्ये कामकाज सुरू केलेल्या या कंपनीने 2018 मध्ये 10 लाख विद्यार्थ्यांच्या नोदणीचा टप्पा गाठला होता. त्यानंतर केवळ तीनच वर्षांत ही संख्या दुप्पट झाली आहे. 

दरमहा 70 हजार विद्यार्थी या प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षण घेतात. एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जेवढे विद्यार्थी शिकत असतील, तेवढे विद्यार्थी या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही वेळेत सक्रीय असतात. ‘कोविड’च्या साथीमुळे या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ होण्यास वेग आला आहे. अनेक व्यावसायिक आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी ऑनलाईन अभ्यास करून आपल्या वेळेचा योग्य प्रकारे उपयोग करू लागले आहेत.

‘सिंपलीलर्न’ची सतत संपर्क साधत शिकवण्याची पद्धत, बूटकॅम्प-शैलीचे शिक्षणाचे मॉडेल, हाताने सराव करण्याजोगे प्रोजेक्ट्स आणि आघाडीची जागतिक विद्यापीठे आणि कॉर्पोरेट्स यांच्यासह भागीदारी, यांमुळे जगभरातील व्यक्ती आणि कॉर्पोरेट्स यांनी कौशल्यवाढीसाठी आपल्या प्राधान्याचा भागीदार म्हणून हा प्लॅटफॉर्म निवडला आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘एडब्ल्यूएस’, ‘आयबीएम’ आणि ‘फेसबुक’ यांसारख्या भागीदारांसह ‘सिंपलीलर्न’चे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विकसीत करण्यात आले आहेत. ही कंपनी सध्या ‘परड्यू युनिव्हर्सिटी’, ‘कॅलटेक सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एज्युकेशन’ आणि ‘यूमास अमहर्स्ट’ यांच्या सहकार्याने 15 पदव्युत्तर अभ्यासक्रम देऊ करीत आहे. यामध्ये ‘डेटा सायन्स’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘डेव्हऑप्स’, ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’, ‘प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट’ आणि ‘डिजिटल मार्केटिंग’ या क्षेत्रांतील कौशल्ये शिकवली जातात.

‘सिंपलीलर्न’ने 2020 मध्ये, ‘स्किलअप’ नावाचा एक विनामूल्य कौशल्य विकास कार्यक्रम सादर केला. या प्रोग्रॅममध्ये एक हजारांहून अधिक तास एवढ्या कालावधीत स्वयं-वेगवान व्हिडिओ शिक्षणाच्या माध्यमातून 300 डिजिटल कौशल्ये शिकवली जातात. यामध्ये शिक्षणार्थ्यांना अव्वल दर्जाच्या व्यावसायिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील विषय विनामूल्य निवडता येतात. त्यातून त्यांना योग्य शिक्षण आणि करिअरचे निर्णय घेण्यात मदत होते.

Related Stories

टिकटॉकला पर्यायी ‘रिल्स’ ॲप लवकरच…

datta jadhav

गुगलने ‘प्ले स्टोर’वरून हटवले 30 अ‍ॅप्स

datta jadhav

…तर Google अकाऊंट बंद होईल

datta jadhav

वारणा दुध संघाच्या कर्मचाऱ्यांची गुजरातच्या आनंद दूध प्रकल्पास भेट

triratna

‘गुगल क्लासरुम-मीट’ यावर मिळणार जादाचे फिचर्स

Amit Kulkarni

मानवी शरीराप्रमाणे चक्क निर्जीव वस्तूंचे ही ऑक्सिजन मोजतात ऑक्सीमिटर

Shankar_P
error: Content is protected !!