तरुण भारत

टूलकिट प्रकरण: दिशा रवीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

बेंगळूर/प्रतिनिधी

शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिशा रवी हिला दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर दिशाला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने दिशाला ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान पोलिसांनी मागणी फेटाळून लावत दिशाला जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिशाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक टूलकिट स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात दिशा रवी हिला बेंगळुरातील तिच्या घरून अटक केली होती. अटक केल्यानंतर दिशाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडी एका दिवसाने वाढण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी आज दिशाला पटियाला हाऊस सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश धर्मेंदर राणा यांनी दिशाला दोन जामीनदारांसह एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Related Stories

आगामी निवडणुका एकत्र येऊन लढा : सुरजेवाला

Patil_p

देशात कोरोनाचे नवे 3320 रूग्ण

Patil_p

दिल्लीत चोवीस तासांत 384 कोरोना रुग्ण

pradnya p

दिल्लीत दिवसभरात 197 नवे कोरोना रुग्ण; 10 मृत्यू

pradnya p

भारतात पुनरागमनासाठी पबजीचा मोठा निर्णय

Patil_p

राष्ट्रीय आपत्ती

tarunbharat
error: Content is protected !!