तरुण भारत

मेक्सिकोत कोरोनाने घेतले 1.80 लाख बळी

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 

मेक्सिकोत आतापर्यंत 20 लाख 43 हजार 632 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 80 हजार 536 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

वर्ल्डोमीटरनुसार, सोमवारी या देशात 03 हजार 104 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 310 जणांचा मृत्यू झाला. 20.43 लाख रुग्णांपैकी 16 लाख 02 हजार 024 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 61 हजार 072 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 4798 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिको जगात तेराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 52 लाख 85 हजार 123 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Related Stories

188 देशांमध्ये फैलाव 13671 बळी

tarunbharat

तृणमूलचे 5 खासदार भाजपच्या वाटेवर?

Patil_p

अफगाणिस्तान संघर्षात 34 जणांचा मृत्यू

Omkar B

नवा संकरावतार 90 टक्के जुन्या विषाणूसारखा

Omkar B

जन्मताच या मुलीने वेधले जगाचे लक्ष

Patil_p

तिबेटी नेत्याचा पहिल्यांदाच व्हाइट हाउस दौरा

Patil_p
error: Content is protected !!