तरुण भारत

कार्यकर्त्यांनी लोकांसाठी मदतकेंद्र म्हणून काम : चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम / पुणे :

कोणत्याही शहरात तीन प्रश्न महत्त्वाचे असतात. स्थानिक पातळीवरचे प्रश्न यामध्ये रस्ते, पाणी, दिवे, पार्किंग असे प्रश्न असतात. दुसरे म्हणजे नागरिक  मोठ्या संख्येने बाहेर असतात, त्यासाठी चांगले रस्ते, बसेसची संख्या वाढविणे, रुट वाढविणे, फ्लायओव्हर अशा सुविधा देणे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे  लोकांशी थेट जोडले जाणे. अनेकांच्या घरात मुलांची फी भरायला पैसे नसणे, घरी एकटेच असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत या गोष्टी करता येतील. याकरीता सगळे कार्यकर्त्यांनी लोकांसाठी मदतकेंद्र म्हणून काम करावे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.


भाजप पुणे शहर उपाध्यक्ष सुनील नामदेव पांडे (लोहगांवकर) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन भांडारकर रोड, साने डेअरी चौक येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, दत्तात्रय खाडे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, भाजप पुणे शहर उपाध्यक्ष सुनील नामदेव पांडे (लोहगांवकर) आदी यावेळी उपस्थित होते. 


चंद्रकांत पाटील म्हणाले, माणूस आपला आहे, असे वाटण्याची सुरुवात जनसंपर्क कार्यालयापासून होते. कार्यालय सुरु झाल्यावर कार्याचा ओघ वाढतो. नागरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. लोकांना आवश्यक त्या सुविधा द्यायला हव्या. यामुळे लोक जोडले जातात, असेही त्यांनी सांगितले. 


गिरीष बापट म्हणाले, कार्यकर्त्यांचे जनसंपर्क कार्यालय असणे आवश्यक आहे. जनसंपर्क कार्यालय असणे म्हणजे निम्मे यश मिळाल्यासारखे आहे. उर्वरीत यश त्या कार्यालयाचा उपयोग करुन लोकांच्या समस्या सोडविल्याने मिळते. आज खूप नागरिक आशेने भारतीय जनता पक्षाकडे पाहत आहे. पूर्वी भाजपचे २-३ खासदार असायचे आता संख्या ३०० च्या पुढे गेली आहे. आगामी काळात ही संख्या आणखी वाढवायची आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुनील पांडे म्हणाले, जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांसाठी कार्य करणार आहे. लोकांशी एकाच ठिकाणाहून थेट संपर्क साधता येणे, यामुळे सहज शक्य होणार आहे. हे कार्यालय नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत खुले राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सिद्धार्थ शिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Stories

सोलापूर : यूपीएससी परीक्षेत वाघोलीच्या सागर मिसाळनी केले घवघवीत यश संपादन

triratna

बार्शी तालुक्यातील शेलगाव(मा) हद्दीतील ओढ्यावरील बंधारा गेला वाहून

triratna

पुणे विभागातील 5 लाख 4 हजार 316 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून पुन्हा कडक लॉक डाऊन : अजित पवार

pradnya p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करुया : जिल्हाधिकारी

pradnya p

यूपीएससी परीक्षेत पंढरपुरातील विद्यार्थ्यांचा झेंडा

triratna
error: Content is protected !!