तरुण भारत

चौथ्या तिमाहीत स्मार्टफोन विक्रीत घसरण

घसरणीनंतरही सॅमसंग तेजीत – ग्लोबल रिसर्च फर्म गार्टनरचा अहवाल

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

Advertisements

वर्ष 2020 मधील चौथ्या तिमाहीमध्ये जगभरातील स्मार्टफोन विक्रीत 5.4 टक्क्यांची घसरण आली आहे. संपूर्ण वर्षभरातील आकडेवारी पाहिल्यास यामध्ये स्मार्टफोनची जागतिक पातळीवरील विक्री ही 12.5 टक्क्यांनी घसरली आहे. दुसऱया बाजूला मात्र या घसरणीतही सॅमसंगची विक्री चौथ्या तिमाहीमध्ये तेजीत राहिली असून ऍपल सर्वोच्च स्थानी राहिली आहे.

सॅमसंगने वर्ष 2020 मध्ये वार्षिक पातळीवरील विक्रीत 14.6 टक्क्यांची घसरण नोंदवली असली तरी संपूर्ण वर्षामध्ये मात्र 2.53 लाखापेक्षा अधिकचे फोन विकत जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन विकणारी कंपनी ठरली आहे. यामध्ये  स्मार्टफोन विक्रेत्यांपैकी शाओमी, ओप्पो आणि विवो यांच्यासोबत जोरदार स्पर्धा करावी लागली आहे.

वार्षिक विक्रीत ऍपल-शाओमी तेजीत

वर्ष 2020 मध्ये ऍपल आणि शाओमी या कंपन्या पहिल्या पाचमध्ये आहेत, यातील दोन स्मार्टफोन विक्रेत्यांनी मात्र वार्षिक पातळीवरील विक्रीत तेजी नोंदवली आहे. विक्रीतील आकडेवारीत सर्वाधिक 24.1 टक्क्यांची घसरण ही हुआईमध्ये राहिली आहे.

जागतिक पातळीवर 5.4 टक्क्यांची घसरण

चौथ्या तिमाहीतील आकडेवारीनुसार फक्त तीन कंपन्यांनी विक्रीमध्ये वाढ नोंदवली आहे. ज्यामध्ये ऍपल, शाओमी आणि ओप्पोचा समावेश आहे. चौथ्या तिमाहीत मात्र 3.84 लाखपेक्षा अधिक स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. 2019 च्या तुलनेत ही घसरण 5.4 टक्क्यांवर राहिली आहे.

Related Stories

एमआय 10 स्मार्टफोन 8 ‘मे’ला बाजारात

Patil_p

‘आयकू’चा पहिला स्मार्टफोन बाजारात

tarunbharat

लावाचा स्मार्टफोन बाजारात

Patil_p

ओप्पोचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन दाखल

Patil_p

रियलमीचे कमी किंमतीचे फोन बाजारात

Patil_p

इनफिनीक्स नोट 10, नोट 10 प्रो बाजारात

Patil_p
error: Content is protected !!