तरुण भारत

17 वर्षांनी बॉलिवूडमध्ये नागार्जुनचे पुनरागमन

ब्रह्मास्त्र चित्रपटाचे चित्रिकरण केले पूर्ण

दाक्षिणात्य सुपरस्टार अक्किनेननी नागार्जुन 17 वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. अलिकडेच नागार्जुन यांनी करन जौहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखालील अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे.

अमिताभ बच्चन, रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा अनुभव नागार्जुन यांनी मांडला आहे. मुंबईत झालेले स्वागत अनोखेच होते. करन जौहर आणि त्याच्या टीमने मला एखाद्या राजाप्रमाणे वागविले आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत कुठलेच दृश्य नसल्याचे नागार्जुन यांनी सांगितले आहे. यापूर्वी नागार्जुन हे ‘एलओसी-कारगिल’ या 2003 साली प्रदर्शित चित्रपटात दिसून आले होते.

Related Stories

अभिनेता सोनू सूदला हायकोर्टाचा दणका

pradnya p

रोहिणी हट्टंगडींचा लॉकडाऊनचा काळ सुखाचा

triratna

समांतर 2 चे चित्रीकरण सुरु

Patil_p

देशासाठी गायक सुखविंदर सिंग यांची साद

Patil_p

सोशल मीडियापासून लांब, पुस्तकांच्या जवळ…

Patil_p

कोरोनाविषयक सामाजिक लघुपट सातासमुद्रापार

Patil_p
error: Content is protected !!