तरुण भारत

इंडोनेशियात रात्री चमकणारे गूढ सरोवर

सरोवरांना त्यांच्या सुंदरपणासाठी ओळखले जात असले तरीही जगातील काही सरोवरे अत्यंत रहस्यमय आहेत. यातीलच एक आहे इंडोनेशियातील कावाह इजेन सरोवर. हे जगातील आतापर्यंतचे ज्ञात सर्वात आम्लीय सरोवर आहे. तेथे पाण्याचे तापमान सुमारे 200 अंश सेल्सिअस असते, पण सरोवरातील सर्वात गूढ गोष्ट आहे त्याचा रंग. याचे पाणी रात्री निळय़ा दगडाप्रमाणे चमकू लागते. 

इंडोनेशियात जगातील एकूण जागृत ज्वालामुखींपैकी 75 टक्के ज्वालामुखी आहेत. यातीलच एक ज्वालामुखी आहे कावाह इजेन. याच नावाने एक सरोवर असून ते ज्वालामुखीच्या नजीक आहे. या सरोवरातील पाणी सातत्याने उकळत राहते, याचमुळे या परिसरात कुठलीच वस्ती नाही. रात्रीच्या वेळी सरोवरील पाण्यातून निळा-हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर पडत असल्याने याबद्दल लोकांचे आकर्षण वाढतच गेले आहे.

Advertisements

कित्येक वर्षांच्या संशोधनानंतर वैज्ञानिकांना या रहस्याची उकल करता आली आहे. ज्वालामुखीतून हायड्रोजन क्लोराइड, सल्फ्युरिक डायऑक्साइड यासारखे अनेक प्रकारचे वायू बाहेर पडत आहेत. या वायू परस्परांमध्ये मिसळत असल्याने निळा रंग निर्माण होतो. पण सरोवर अत्यंत धोकादाय असल्याने याच्या नजीक वैज्ञानिकही दीर्घकाळ राहण्याचे धाडस करू शकत नाहीत.

जवळपास 15 हजार रुपयांचे शुल्क भरून काही पर्यटक या सरोवराच्या नजीक जाण्याचे धाडस दाखवतात, पण काही अंतरावर जाऊन परत येतात. तेथील हवेत कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत सल्फर तसेच अन्य विषारी वायू फैलावलेले असल्याने श्वास घेणे अवघड हेते.

Related Stories

जपानला मिळाला नवा पंतप्रधान

Patil_p

अन्वी भूटानीची ऑक्सफोर्डच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत बाजी

Patil_p

तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण रखडण्याची चिन्हे

Amit Kulkarni

…म्हणून वॉरेन बफेट यांनी विकले सर्व सोने

datta jadhav

6 आठवडय़ात कोरोना बाधितांचे प्रमाण दुप्पट

Patil_p

पाकिस्तानात बजबजपुरी

tarunbharat
error: Content is protected !!