तरुण भारत

आवाज ऐकून पाण्याबाहेर पडतात मगरी

एक हात असलेला पुजारी अन् मगरींवरील माया

सर्वसाधारणपणे लोकांना मगर पाहणे आवडत असले तरीही त्याला दुरून पाहणेच पसंत केले जाते. मगरीच्या जवळ जाणे जीवघेणे ठरू शकते. मगरींचा स्वभाव अत्यंत आक्रमक असतो. पण मंदिराचे पुजारी सीताराम दास यांच्याबाबत या धोकादायक प्राण्यांचा विचार काहीसा वेगळा आहे. दास यांचा आवाज ऐकून या मगरी पाण्यातून बाहेर येतात. एवढेच नाही तर पुजारी या मगरींना त्यांच्या चेहऱयाने ओळखतो. छत्तीसगडच्या कोटमी सोनार येथील एका तळय़ानजीक दास दिसून येतात. त्यांची या मगरींवर अत्यंत माया आहे. ही माझीच मुले असल्याचे पुजारी सांगतात. एका माणसाचा आवाज आणि हाताच्या खुणांना मगरी ओळखतात आणि समजूनही घेतात.

Advertisements

सुमारे 15 वर्षांपूर्वी दास मगरीच्या हल्ल्याचे शिकार झाले होते. या हल्ल्यात दास यांना स्वतःचा एक हात गमवावा लागला होता.  या घटनेनंतरही त्यांना या मगरींची भीती तसेच द्वेष नाही. एक हात गमावल्यावरही पुजारी यांनी या मगरींकरता काम करण्याचा निर्णय घेतला. गोरखपूर येथून दास हे या गावात सुमारे 50 वर्षांपूर्वी आले होते. त्यांचे काम गायींची देखभाल करणे होते, पण याऐवजी ते मगरींकडे आकृष्ट झाले. दास यांनी स्वतःचे पूर्ण जीवन मगरींच्या सेवेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेल्यावर माझे शरीर तलावात फेकून देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी फरार असणारा दीप सिद्धू अटकेत

Abhijeet Shinde

केंद्र सरकारकडून सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी

datta jadhav

टीना डाबी-अथर अमीर खान यांचा घटस्फोट

Patil_p

घरगुती सिलिंडर 15 रुपयांनी महाग

Patil_p

विस्तारवादी धोरण ही मानसिक विकृती

Patil_p

सक्रिय रुग्णसंख्या 2 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!