तरुण भारत

गुजराथ महानगरपालिकांमध्ये भाजप दणदणीत

पटकाविल्या 80 टक्क्यांहून अधिक जागा, काँगेसचा धुव्वा

गांधीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

गुजरातच्या शहरी भागांवरील आपले निर्विवाद वर्चस्व भाजपने पुन्हा सिद्ध केले आहे. राज्यातील सहा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने 80 टक्क्यांहून अधिक स्थानांवर विजय मिळवून काँगेस व इतर विरोधी पक्षांचा धुव्वा उडविला. आम आदमी पक्षाने सुरतमध्ये काँगेसपेक्षा अधिक जागा जिंकून लक्ष वेधून घेतले आहे. तर अहमदाबादमध्ये एमआयएमने चार जागा जिंकून गुजरातच्या राजकारणात प्रवेश केला. काँगेसची मात्र सर्वत्र दयनीय अवस्था दिसत आहे.

अहमदाबाद (192 जागा), सुरत (120 जागा), वडोदरा (76 जागा), जामनगर (64 जागा), राजकोट (56 जागा) आणि भावनगर (52 जागा) या महानगरपालिकांच्या एकंदर 572 स्थानांसाठी ही निवडणूक झाली होती. या सर्व महानगरपालिका गेली अनेक दशके भाजपकडेच आहेत. यावेळीही काही वेगळे घडविणे विरोधकांना शक्य झालेले नाही. आम आदमी पक्षाने मात्र सुरत महानगरपालिकेत पहिल्याच प्रयत्नात बऱयापैकी यश मिळविले आहे.

राजकोटमध्ये शतप्रतिशत भाजप

राजकोट महानगरपालिकेत भाजपने सर्व 56 स्थाने जिंकून इतिहास घडविला आहे. येथे विरोधकांना एकाही स्थानावर विजय मिळविता न आल्याने महानकरपालिकेत विरोधी पक्षच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर सुरत महानगरपालिकेच्या 120 जागांपैकी 25 वर विजय मिळवत आम आदमी पक्षाने काँगेसला मागे टाकण्याची कामगिरी केली. अहमदाबादमध्ये एमआयएमने मुस्लीम बहुल भागांमध्ये चार जागा घेत नवा पायंडा निर्माण केला आहे.

काँगेस नेत्याचे त्यागपत्र

सुरत शहर काँगेस शाखेचे अध्यक्ष बाबू रायका यांनी पक्षाच्या दुर्दशेचे उत्तरदायित्व स्वीकारत पदत्याग केला आहे. त्यांनी आपले त्यागपत्र गुजरात प्रदेश काँगेस अध्यक्षांकडे पाठविले. इतक्या मोठय़ा पराभवाची अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया या पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

बॉक्स

विजय रूपानींकडून आभार

भाजपला मिळालेल्या प्रचंड विजयासाठी कार्यकर्त्यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बॉक्स

असा झाला भाजपचा विजय

महानगरपालिका                      भाजप    काँगेस    इतर

अहमदाबात (192 जागा)            160      21        11

सुरत (120 जागा)                     84        10        26

वडोदरा (76 जागा)                   64        10        02

जामनगर (64 जागा)     56        08        00

राजकोट (56 जागा)      56        00        00

भावनगर (52 जागा)     48        04        00

Related Stories

भाजपची साथ सोडून तेजस्वींना आशीर्वाद द्या, नितीश कुमारांना आली ऑफर

datta jadhav

‘गुलाब’ चक्रीवादळ घोंघावणार

datta jadhav

केंद्र सरकारकडून ‘ऑफसेट’ पॉलिसी रद्द

datta jadhav

16 वर्षाच्या मुलाची गळफास घेवून आत्महत्या

Patil_p

जीएसटी संकलनात मे महिन्यात घट

Patil_p

छटपूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

Rohan_P
error: Content is protected !!