तरुण भारत

कोल्हापुरात कोरोना केअर सेंटरचे `सॅनिटायझेशन’ सुरू

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने बंद असलेली कोरोना केअर सेंटर कार्यान्वित केली जात आहे. काही केअर सेंटरचे सॅनिटायझेशन सुरू झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लस घ्या, असे आदेश पंटलाईन वर्कर्सना वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे कोरोना टेस्ट आणि व्हॅक्सिनेशनवर भर देण्यासाठी आढावा बैठका सुरू झाल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी आरोग्य विभागाच्या गतीमान हालचाली सुरू असल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रतिदिन 15 ते 20 येत आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यात आरोग्य विभागाने प्रत्येक स्तरावर बैठका घेतल्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरण उद्दिष्ट पुर्तीसाठी वरिष्ठांचे आदेश गेले. त्यातूनच गेली तीन महिने बंद असलेली केअर सेंटर नव्याने कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. केअर सेंटरच्या सॅनिटायझेशनला सुरूवात झाली आहे.

मुंबई, पुण्यासह साताऱयात कोरोना रूग्णसंख्या वाढली. राज्यात 15 दिवसांत रूग्णसंख्या दुप्पट झाल्याने सरकारने लॉकडाऊनसाठी अल्टीमेटम दिला. अमरावतीत लॉकडाऊन सुरू आहे. पुण्यात रात्रीची संचारबंदी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसांत कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाला. शहरात कोरोना रूग्णांत वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत पंटलाईन वर्कर्सचे लसीकरण शुक्रवारपर्यत पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या.

या आढावा बैठकीनंतर जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महापालिकेच्या आरोग्य विभागाने आढावा बैठका घेतल्या. त्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची माहिती घेतली. शुक्रवारपर्यत लस घ्या, असे निर्देश दिले. लस न घेणाऱयांची यादीही सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नवे रूग्ण, कंटेनमेंट झोन, केअर सेंटरची माहिती संकलित होत आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची सीपीआर हॉस्पिटलमध्ये बैठक झाली. या बैठकीत आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. उपलब्ध यंत्रसामग्री, केंअर सेंटरमधील सुविधा, सॅनिटायझेशन, उपलब्ध स्टाफ आणि नियोजनावर चर्चा झाली. याचवेळी महाविद्यालयीन स्तरावर कमी झालेल्या लसीकरणावरही चर्चा झाली. आढावा बैठकांनंतर कोरोना काळात असलेल्या जबाबदाऱया कायम ठेवल्या आहेत. आयसोलेटेड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठा, गंभीर रूग्णांसाठी वाढीव बेडचे नियोजन सुरू आहे. केअर सेंटरचे सॅनिटायझेशन सुरू असताना तेथील स्टाफ नियुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Related Stories

कोल्हापूरात ४९० कोरोनाबाधित, २७ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

राजारामच्या सभासदाभिमुख योजनांवर टीका म्हणजे सभासद विरोधी भूमिका

Abhijeet Shinde

यंदाही लग्नसराईत छायाचित्रकारांचे नुकसान

Abhijeet Shinde

लसीकरणात अडथळा आणल्याबद्दल ग्रामपंचायत शिपायावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : रस्त्याच्या मधोमध लटकतायत झाडाच्या फांद्या, वाहतूक बनली धोक्याची

Abhijeet Shinde

जिल्हा युवा महोत्सव गुरुवारपासून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!