तरुण भारत

हे अमेरिकेचे न्यायालय नव्हे!

युवर ऑनर संबोधिल्यावर सरन्यायाधीशांची टिप्पणी

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वकिलाने सरन्यायाधीशांना ‘युवर ऑनर’ संबोधिल्यावर त्यांनी आक्षेप दर्शविला आहे. या प्रकरणी वकिलाने माफी मागत ‘माय लॉर्ड’ म्हणून संबोधित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 4 आठवडय़ांसाठी टाळली आहे.

सरन्यायाधीश बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात कायद्याचे विद्यार्थी स्वतः उपस्थित झाले होते आणि संबोधनादरम्यान त्यांनी सरन्यायाधीशांना युवर ऑनर म्हणून संबोधित केले. यावर आक्षेप घेत सरन्यायाधीशांनी हे अमेरिकेचे न्यायालय नव्हे, युवर ऑनर या शब्दाचा वापर करत संबोधू नका असे सुनावले. यावर कायद्याच्या विद्यार्थ्याने माफी मागत माय लॉर्ड असा उल्लेख केला.

कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती विषयक अर्जावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वरील टिप्पणी केली आहे. तुमची तयारी पूर्ण नाही, मलिक मजहर सुल्तान खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास केलेला नाही, पुढील सुनावणीवेळी पूर्ण तयारीनिशी या असे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले आहे.

युवर ऑनरचा वापर कनिष्ठ न्यायालयात

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या परंपरेच्या अंतर्गत भारतात न्यायाधीशांना युवर लॉर्डशिप किंवा माय लॉर्ड संबोधिण्यात येते. युवर ऑनर असे संबोधन साधारणपणे कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांसाठी केले जाते.

इंग्लंडची परंपरा वेगळी

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि बार असोसिएशननेही अनेकदा संबोधनाप्रकरणी ‘सर’ या शब्दाचा वापर होऊ शकतो असे सांगितले आहे. अनेकदा वकील ‘सर’ असा उल्लेख करत संबोधित करतात. इंग्लंडमध्ये तेथील न्यायालयात बहुतांश औपचारिक संबोधन असून तसेच तेथे पोशाखात वकील तसेच न्यायाधीशांना विगही लावावा लागतो. पण अमेरिकेच्या न्यायालयात आता गोष्टी बऱयाचअंशी अनौपचारिक असून तेथे ब्लॅक सूट, पांढऱया शर्टमध्ये वकील उपस्थित राहतात. तर गाऊनचे प्रचलन तेथे राहिलेले नाही.

Related Stories

दिल्लीत 2,463 नवे कोरोना रुग्ण; 50 मृत्यू

pradnya p

बलात्कार पीडितेची प्रकृती गंभीरच

Patil_p

ट्रॅक्टर रॅलीवर दहशतवाद्यांचा डोळा

datta jadhav

आरक्षणासाठी गुर्जर समुदाय आंदोलनाच्या पवित्र्यात

Patil_p

तीन दहशतवाद्यांचा एलओसीवर खात्मा

Patil_p

जागतिक बँकेची भारताला 1 अब्ज डॉलरची मदत

Patil_p
error: Content is protected !!