तरुण भारत

लंकेच्या शनाकाचे प्रयाण लांबणीवर

वृत्तसंस्था/ कोलंबो

लंकन क्रिकेट संघाने विंडीजच्या दौऱयावर प्रयाण केले आहे. दरम्यान लंकन संघातील शनाका याचे प्रयाण मात्र लांबणीवर पडल्याची माहिती क्रिकेट लंकेच्या प्रवक्त्याने दिली. व्हिसा समस्येमुळे शनाकाला लंकन संघाबरोबर प्रयाण करता आले नाही.

सोमवारी विंडीज दौऱयासाठी लंकन क्रिकेट मंडळाने वनडे आणि टी-20 संघाची घोषणा केली आहे. लंकेच्या टी-20 संघाचे नेतृत्व दसुन शनाकाकडे सोपविले आहे तर लंकन वनडे संघाचे नेतृत्व डी. करूणारत्ने करीत आहे. या दौऱयात लंका आणि विंडीज यांच्यात दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.

लंकन संघ- डी. करूणारत्ने (कर्णधार), डी. शनाका, डी. गुणतिलके, पी. निशांका, ए.बंदारा, ओ. फर्नांडो, दिनेश चंडीमल, अँजेलो मॅथ्युज, डिक्वेला, टी. परेरा, के. मेंडीस, हसरंगा, रमेश मेंडीस, कुमारा, प्रदीप, ए. फर्नांडो, चमिरा, अकिला धनंजय, लक्षण संदकन, डी. मधुशंका, एस. लकमल.

Related Stories

कोव्हिडमुळे यंदा टी-20 वर्ल्डकप शक्य नाही

Patil_p

फॉलोऑननंतर पाकिस्तानची सावध सुरुवात

Patil_p

माजी नेमबाज व प्रशिक्षिका पूर्णिमा जनाने यांचे निधन

Patil_p

नवा वाद…धोनी सातव्या स्थानी का उतरला?

tarunbharat

होल्डर, कॅम्पबेल यांची अर्धशतके

Patil_p

व्हेरेव्हची प्रशिक्षकाबरोबर फारकत

Patil_p
error: Content is protected !!