तरुण भारत

भव्यदिव्य मोटेरा स्टेडियमची 10 वैशिष्टय़े

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या गेलेल्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमवर आज पहिलावहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नूतनीकरण केल्या गेलेल्या या स्टेडियमची 10 खास वैशिष्टय़े…

1) मोटेरा स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 1 लाख 10 हजार आहे, हे मुख्य वैशिष्टय़. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम होते. आता मोटेरा हे जागतिक स्तरावरील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असेल.

2) अहमदाबादमधील या भव्यदिव्य स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी 800 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 1984 मध्ये जुन्या मोटेरा स्टेडियमवर पहिला सामना खेळवण्यात आला होता.

3) या स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्सेस असून त्यातील प्रत्येक बॉक्सची क्षमता 25 महनीय व्यक्तींना सामावून घेण्याची आहे. हे सर्व कॉर्पोरेट बॉक्सेस अर्थातच वातानुकुलित आहेत.

4) स्टेडियम आवारातील पार्किंगमध्ये तब्बल 3 हजार कार व 10 हजार दुचाकी पार्क केल्या जाऊ शकतात. हे स्टेडियम प्रेक्षकक्षमतेच्या निकषावर नव्हेच तर स्टेडियमच्या पार्किंग स्पेसच्या निकषावर देखील सर्वात मोठे असणार आहे.

5) मोटेरा स्टेडियममध्ये अत्याधुनिक सोयींची क्रिकेट अकादमी देखील उभारली गेली असून इनडोअर पिचेस व क्रिकेटपटूंच्या सरावासाठी अगदी फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉल आदी खेळांची छोटी मैदाने देखील सुसज्ज आहेत.

6) स्टेडियमकडे येणे सोयीचे व्हावे, यासाठी अहमदाबाद मेट्रो स्टेशनची सुविधा स्टेडियमपासून नजीकच उपलब्ध करुन दिली गेली आहे. चाहत्यांना यामुळे सामन्यासाठी येत असताना ट्रफिक जॅमची अडचण येणार नाही.

7) 63 एकर परिसरात वसलेल्या या नव्या स्टेडियमला एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यामुळे, तीन ठिकाणाहून प्रवेश असेल आणि यामुळे मोठी प्रेक्षकक्षमता असली तरी कोठेही कोंडी होणार नाही.

8) एखाद्या भारतीय क्रिकेट स्टेडियममध्ये एलईडी लाईट बसवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अन्य कोणत्याही स्टेडियममध्ये एलईडी लाईट्सची सुविधा नाही. फ्लडलाईटऐवजी छताच्या चोहोबाजूंनी एलईडी लाईट बसवले गेले आहेत.

9) स्टेडियममध्येच वसलेले 55 आलिशान खोल्यांचे क्लबहाऊस हे देखील या स्टेडियमचे आणखी एक वैशिष्टय़. सदर क्लबहाऊसमध्ये इनडोअर, आऊटडोअर गेम्स, रेस्टॉरंट, ऑलिम्पिक साईजचे स्विमिंग पूल, जिम व त्याचप्रमाणे थ्री डी प्रोजेक्टर थिएटरचा अंतर्भाव आहे.

10) मोटेरा स्टेडियमच्या प्रत्येक स्टँडमध्ये फुड कोर्ट असणार आहे. अन्य बऱयाच स्टेडियममध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. या स्टेडियमचे कंत्राट एल अँड टी कंपनीला दिले गेले होते. त्यांनी 5 वर्षांच्या कालावधीत या स्टेडियमचे सुसज्ज नूतनीकरण केले आहे.

Related Stories

शकीब अल हसन बॅटचा लिलाव करणार

Patil_p

आयपीएल जेतेपदासाठी उद्या मुंबई-दिल्ली आमनेसामने

Patil_p

कोणी साकारला मैदानावरच ‘बिहू डान्स’?

Omkar B

लँकेशायर कौंटीचे अध्यक्ष डेव्हिड हॉजकिस यांचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

बेजबाबदार वर्तणुकीचा कळस : कोहली

Patil_p

रवी शास्त्री म्हणतात, निवड समितीने रोहित शर्माला ‘या’ कारणासाठी वगळले!

Patil_p
error: Content is protected !!