तरुण भारत

लंकेचा उपुल थरंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

कोलंबो / वृत्तसंस्था

श्रीलंकेचा अनुभवी सलामीवीर उपुल थरंगाने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 36 वर्षीय थरंगा 15 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. यातील काही काळ त्याने लंकन संघाचे नेतृत्वही भूषवले आहे. यापूर्वी 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या दिग्गज खेळाडूने लंकेतर्फे शेवटचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीत्व केले. त्याने ट्वीट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

Advertisements

थरंगाने लंकेतर्फे 31 कसोटी सामने खेळत 21.89 च्या सरासरीने 1754 धावा जमवल्या. त्याने या सर्वोच्च क्रिकेट प्रकारात 3 शतके व 8 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये अहमदाबाद येथे भारताविरुद्ध पदार्पणाचा कसोटी सामना खेळला आणि याच संघाविरुद्ध 2017 मध्ये पल्लेकेले येथे शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

डावखुरी फलंदाजी करणाऱया थरंगाने वनडे क्रिकेटमध्ये अधिक यश मिळवले असून त्याच्या खात्यावर 235 सामन्यात 33.74 सरासरीसह 6951 धावा आहेत. त्याने ऑगस्ट 2005 मध्ये विंडीजविरुद्ध वनडे पदार्पण केले. मर्यादित षटकांच्या या क्रिकेट प्रकारात थरंगाने 15 शतके व 37 अर्धशतके साजरी केली. नाबाद 174 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. थरंगाने याशिवाय लंकेतर्फे 26 टी-20 सामनेही खेळले असून त्यात 47 या सर्वोच्च खेळीसह 407 धावांचे योगदान दिले आहे.

Related Stories

अनिर्णित सामन्यात मुंबईला तीन गुण

Patil_p

झिम्बाब्वेचा बांगलादेशवर 23 धावांनी विजय

Patil_p

लेवान्डोस्की बुंदेस्लिगा हंगामातील सर्वोत्तम खेळाडू

Patil_p

विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा रद्द

Patil_p

इंग्लंड-द. आफ्रिका चौथी कसोटी उद्यापासून

Patil_p

वनडेतील कोहली, रोहितची स्थाने कायम

Omkar B
error: Content is protected !!