तरुण भारत

बसाप्पा पेठेतील खोदकाम उघडयावर

वाहतूकीस अडथळा – परिसरात लाईट नसल्याने अपघाताची शक्यता नगरसेवकांचे दुर्लक्ष

प्रतिनिधी/ सातारा

करंजे रोड येथील बसाप्पा पेठेतील कै. बबनराव भोसले चौकात गेल्या आठ दिवसापासून खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्याच्या मध्ये मोठा खड्डा निर्माण झाल्याने वाहतूकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. मात्र नगरसेवक ते सभापती असे कोणीही या खोदकामविषयी माहिती देण्यास तयार नाही.

        शहरातील करंजे रोड ते बसाप्पा पेठे मागे वाहनधारक राधिका रोड येथे येतात. या मार्गाने 24 तास वाहतूक सुरू असते. याच परिसरात हॉस्पिटल देखील आहे. रूग्णवाहिका, पेंशटचे नातेवाईक याची गर्दी असते. त्यात हा रस्ता अरूंद आहे. या रस्त्यावर गेल्या आठ दिवसापुर्वी खोदकाम करण्यात आले. संबंधित प्रशासनाने हे खोदकाम केल्याने रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे. हा खड्डा जीवघेणा ठरत आहे. प्रवासादरम्यान वाहनधारकांची कोंडी होत आहे. रात्रीच्या वेळी परिसरात लाईटची सोय नसल्याने वाहने या खड्डयात जाऊन अपघात होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा खड्डा कशासाठी खोदला आहे. ज्या कामासाठी खोदला आहे. ते काम पूर्ण झाले का ? खड्डा कधी मुजवण्यात येणार या बाबत नगरसेवक ते सभापती माहिती देण्यात टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे या खोदकामची जबाबदारी कोण घेणार असा सवाल येथील रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.

Related Stories

उरमोडी आवर्तनाचे पाणी पोहचले खटावमध्ये

triratna

सकल मराठा क्रांतीचा कराडमध्ये मोर्चा

Patil_p

पांगारे येथे बछडय़ासह बिबटय़ा मादीचे दर्शन

Patil_p

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा घोळाबाबत पालकांनी मांडल्या व्यथा

Patil_p

मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन

triratna

कास धरणावरचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद; बेमुदत आंदोलन सुरु

triratna
error: Content is protected !!