तरुण भारत

कोकण मार्गावर 26पासून दोन विकेंड स्पेशल धावणार

प्रतिनिधी/ खेड

कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांमधील गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी दोन विकेंड स्पेशल चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनल -मडगाव 26 फेब्रुवारी ते 26 मार्च तर मडगाव-पनवेल 27 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात आहे. 24 फेब्रुवारीपासून दोन्ही गाडय़ांचे आरक्षण खुले होणार आहे.

 लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव विकेंड स्पेशल पूर्णपणे आरक्षित आहे. दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 8.50 वाजता सुटून दुसऱया दिवशी सकाळी 9.55 वाजता ती मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून दर रविवारी सायंकाळी 4 वाजता सुटून दुसऱया दिवशी पहाटे 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल. 22 डब्यांच्या या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूररोड, वैभववाडीरोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

 पूर्णपणे आरक्षित असणारी 22 डब्यांची मडगाव-पनवेल विकेंड स्पेशल मडगाव येथून दर शनिवारी सकाळी 12 वाजता सुटेल. त्याचदिवशी रात्री 10.30 वाजता पनवेलला पोहचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून दर शनिवारी रात्री 11.55 वाजता सुटून दुसऱया दिवशी दुपारी 1 वाजता मडगावला पोहचेल. या गाडीला कोकण मार्गावर रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूररोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

Related Stories

देवरुखात 16 रोजी व्यावसायिक शिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

Patil_p

धामापूर तलावात बेकायदा चिरे, माती

NIKHIL_N

टाळेबंदी काळातही कोकणातून 2 लाख हापूस पेटय़ांची थेट विक्री

Patil_p

अडीच वर्षानंतर लांजात महामार्ग चौपदरीकरणाला वेग

Omkar B

भोगवेतील नवविवाहितेचा गोव्यात अपघातात मृत्यू

NIKHIL_N

जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या सोडवा!

NIKHIL_N
error: Content is protected !!