तरुण भारत

विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईस प्रारंभ

महापालिकेकडून दंड वसुलीची मोहीम सुरू,मास्क वापरणे बंधनकारक

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्मयता असल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. महानगरपालिकेने मास्क घालण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. त्या पाठोपाठ आता विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसूल करण्याची मोहीम मंगळवारपासून सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.

मागील वषी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला होता. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली होती. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. कोरोना रोखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. मास्क वापरणे, सॅनिटायझेशन आणि सामाजिक अंतर राखण्याची सक्ती करण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने मास्क वापरण्याकडे तसेच सामाजिक अंतर राखण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे.

सध्या राज्यातील सीमा सीलडाऊन करून कोरोना निगेटिक्ह प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि विवाह कार्यक्रम, सभा-समारंभांमध्ये मोजक्मयाच व्यक्ती उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात येत आहे. मागील वषीप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होऊ नये याकरिता आतापासूनच खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

नागरिक- मनपा अधिकाऱयांमध्ये वादावादीचे प्रसंग

मास्क वापरणे सक्तीचे करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सोमवारी विविध भागात जागृती मोहीम राबविण्यात आली. मनपाच्या पथकामार्फत चौक, विविध रस्ते, बाजारपेठ आणि शहराच्या प्रवेशद्वारांवर जागृती करण्यात आली. त्या पाठोपाठ  मंगळवारपासून विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मनपाच्या पथकामार्फत ही मोहीम शहरातील विविध भागात राबविण्यात येत आहे. विनामास्क फिरताना आढळल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येत आहे. मास्क वापरण्याची सक्ती करण्यासाठी महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, दंडाची रक्कम जास्त असल्याने नागरिक आणि मनपा अधिकाऱयांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. वास्तविक पाहता प्रशासनाने विनामास्क फिरणाऱयांकडून 500 रुपये दंड आकारण्याची सूचना केली आहे. मात्र, सर्वसामान्यांना ही रक्कम भरणे अशक्मय आहे. दंडाची रक्कम भरण्यावरून वादावादी होत असल्याने 200 रुपये दंड आकारण्यात येत आहे. बाजारपेठेतील व्यावसायिक विनामास्क कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वत्र जागृती मोहीम राबवून व्यावसायिकांकडूनही दंड वसुली करण्यात येत आहे.

Related Stories

उपलोकायुक्तांनी घेतला जिह्याचा आढावा

Patil_p

बँक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम होतेय गायब

Rohan_P

गांभीर्य हरवले…मास्कचे अन् कोरोनाचेही!

Omkar B

खडेबाजार पोलीस स्थानकासमोर दिवसाही उजेड पाडला

Amit Kulkarni

चव्हाट गल्ली शाळा विक्री प्रकरणी 9 जणांवर एफआयआर

Patil_p

बेळगावात तीन अधिकाऱयांना दणका

Amit Kulkarni
error: Content is protected !!