तरुण भारत

देशात 187 रुग्णांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशातील कोरोनाबाधितांमध्ये 187 रुग्णांमध्ये ब्रिटनचा, 6 रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा तर एका रुग्णामध्ये ब्राझीलमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Advertisements

देशातील 10 प्रयोगशाळांमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. त्यामध्ये आतापर्यंत 3500 सॅम्पल घेण्यात आले होते. त्यामधून रुग्णांमधील नव्या स्ट्रेनबाबतची माहिती समोर आली. त्याशिवाय महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणा मध्ये एन 440 आणि ई 484 विषाणूंचे नवे प्रकार आढळून आले आहेत. मात्र, या नव्या स्ट्रेनमुळे संसर्ग वाढत असल्याचे अद्याप समोर आले नाही.

ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे, त्याची कारणे शोधण्यासाठी केंद्राचे एक स्वतंत्र पथक रवाना झाले आहे. या पथकामध्ये एम्स, आयसीएमआरसह राष्ट्रीय संस्थांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.

Related Stories

शेतीला निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडावे लागणार

Amit Kulkarni

राहुल गांधी ‘अकार्यक्षम’ बराक ओबामांचे विधान

Omkar B

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडला

Omkar B

टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा; इतका मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

कर्नाटक राज्यात अंतिम वर्षाची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व विषयाचा परीक्षा रद्द

Rohan_P

अनिल अंबानींनी दिल्ली मेट्रोविरुद्धचा ४,६५० कोटी रुपयांचा खटला जिंकला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!