तरुण भारत

सातारा : प्रतापसिंहनगरात तलवार हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

सातारा : साताऱ्यातील राजवाडा चौपाटीवरील कोयता हल्ल्याने खळबळ माजली असतानाच सायंकाळी प्रतापसिंहनगरमध्ये किरकोळ कारणावरून तलवारीने हल्ला करून एकास जखमी करत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद उर्फ बाळा काशीनाथ सगट व यल्लाप्पा काशीनाथ सगट दोघे रा. प्रतापसिंहनगर या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.  

दि. 22 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान प्रतापसिंहनगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ यातील संशयित व आणखी युवक जमलेले होते. त्यांना यातील तक्रारदार भारत गंगाराम कांबळे वय 46 रा. प्रतापसिंहनगर हे दंगा करु नका, शांत रहा असे म्हणाले. या कारणातून प्रमोद सगट व यल्लाप्पा सगट यांनी तलवारीने त्यांच्या डोक्यात वार केले.  या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जखमी कांबळे यांना तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Advertisements

घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक साळुंखे यांनी भेट देवून तपासाबाबत सूचना केल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने तातडीने हालचाली करत तलवार हल्ला करणाऱ्या दोन्ही संशयितांना 23 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एम. मछले करत आहेत.

Related Stories

महाबळेश्वरच्या व्यापाऱयाला तब्बल साठ हजाराचा दंड

Patil_p

अवैध दारु व्यावसायिकांचे सातारा शहर पोलिसांना ओपन चॅलेंज

Abhijeet Shinde

टेरेसवर ड्रॅगन फ्रुटची शेती

datta jadhav

शहरातील गटारावरील लोखंडी जाळय़ा चोरीला

Patil_p

पाण्याच्या बादलीत पडून चिमुरडीचा मृत्यू

Patil_p

डॉ.आशितोष भोसले यांना वैदयकिय क्षेत्रातला “डॉ.स्टीव्ह रोचा पुरस्काराने सन्मानित

Patil_p
error: Content is protected !!