तरुण भारत

सांगली जिल्ह्यात 10 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यातील विविध आंदोलने व महामेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) (3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 24 फेब्रुवारी 2021 ते 10 मार्च 2021अखेर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे.

Advertisements

मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, अर्वाच्च गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजीचे 06.00 वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक 10 मार्च 2021 पर्यंत अंमलात राहील.

Related Stories

सांगली : कृष्णाकाठावर पाण्याची पातळी स्थिर

triratna

आयएमए सांगलीत स्वतःचे कोविड सेंटर उभारणार

triratna

सांगली : माजी महापौर हारुणभाई शिकलगार यांचे निधन

triratna

सांगली : रोटरीच्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग द्यावा : गव्हर्नर संग्राम पाटील

triratna

सांगली : विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्षाची कैद

triratna

जत तालुक्यातील दरीबडची येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

triratna
error: Content is protected !!