तरुण भारत

मसाला विक्रीमध्ये झाली घसरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागच्या वर्षी एप्रिल ते मे या कालावधीमध्ये कोरोनाच्या प्रभावामुळे घरगुती वापरातील मसाल्याची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली होती. कारण नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या काळजीखातर इम्युनिटी वाढविण्यासाठी मसाल्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली होती. परंतु आता मसाला विक्रीमध्ये अचानकपणे घसरण नोंदवली गेली आहे. या कारणामुळे व्यापाऱयांची चिंता वाढणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. सध्याच्या कालावधीत सामान्य पातळीवर मसाल्याची 20 टक्क्यांचीही विक्री झाली नसल्याची माहिती नॉर्दन स्पाइसेज ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्रकुमार अग्रवाल यांनी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये मसाला विक्री योग्य झाली आहे. तर मार्चमध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर मात्र एप्रिलमध्ये मसाला विप्री वाढली आहे. मसाल्यातील विविध पदार्थाची होणारी मागणी ही मागील काही दिवसांपासून प्रभावीत झाली असून याला कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव कारणीभूत ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements

Related Stories

शेअर बाजारात सेन्सेक्सची विक्रमी घोडदौड

Patil_p

वायदे बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण

datta jadhav

सेबीची दोन कंपन्यांना आयपीओसाठी मंजुरी

Patil_p

कंपनी कायद्यात संशोधन होणार

Patil_p

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

Patil_p

पेटीएमचा वित्त वर्ष 2020 मध्ये महसूल वाढून 3,629 कोटीच्या घरात

Omkar B
error: Content is protected !!