तरुण भारत

मारुती सुझुकीची नवी सुधारीत स्विफ्ट लाँच

कारची किमत 5.73 ते 8.41 लाखांपर्यंत राहण्याचे संकेत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशातील दिग्गज वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने स्विफ्टचे फेसलिफ्ट मॉडेल (सुधारीत) बाजारात दाखल केले आहे. सदरचे मॉडेल हे थर्ड जनरेशन मॉडेल असून याची किमत 5.73 लाख रुपये ते 8.41 लाखापर्यंत राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कंपनीने स्टाईल, फिचर्स आणि इंजिनमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल केल्याचे सांगण्यात येते.

नवीन स्विफ्टमध्ये सर्वात मोठा बदल हा इंजिनमध्ये केलेला असून कंपनीने आपल्या जुन्या 83 हॉर्स पॉवर असणाऱया 1.2 लिटर इंजिनला नवीन 90 हॉर्स पॉवरच्या 1.2 लिटर डुअलजेट पेट्रोल इंजिनसह बदलले आहे.

टेक्नॉलॉजीचा वापर

नवे इंजिन आयडल स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजीसोबत येत असून जे इंधन क्षमता वाढविण्यास मदत करणार आहे. कंपनीचा दावा आहे, की मॅन्युअल गिअरबॉक्ससोबतच्या अपडेटेड स्विफ्टकडून 23.20 किमीचे प्रति लिटर आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्ससहच्या स्विफ्टकडून 23.76 किमीचे मायलेज मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Related Stories

महिंद्रा एक्सयुव्ही 300 बाजारात दाखल

Patil_p

एचओपी इलेक्ट्रीकच्या दोन दुचाकी लाँच

Amit Kulkarni

टीव्हीएसच्या नफ्यात 29 टक्के वाढ

Patil_p

2022 तिमाहीत सुरू होणार बुकिंग

Amit Kulkarni

टोयोटा किर्लोस्करची वाहने महागणार

Patil_p

व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्सनी लाँच केला कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर 

prashant_c
error: Content is protected !!