25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

दुबईतील रॉयल गोल्ड बिर्याणी

जगातील सर्वात महागडी बिर्याणी- एका थाळीची किंमत 20 हजार रुपये

दुबईत बॉम्बे बरो नावाच्या रेस्टॉरंटने ग्राहकांसाठी विशेष प्रकारची बिर्याणी सादर केली आहे. याचे नाव रॉयल गोल्ड बिर्याणी आहे. रॉयल गोल्ड बिर्याणीच्या एका थाळीची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे. दुबईतील ही सर्वात विशेष बिर्याणी असल्याचे संबंधित रेस्टॉरंटचे म्हणणे आहे.

23 कॅरेट गोल्डचा समावेश

बॉम्बे बरो रेस्टॉरंटनुसार रॉयल गोल्ड बिर्याणीत 23 कॅरेट एडिबल गोल्ड (सोन्याचा) वापर करण्यात आला आहे. एडिबल गोल्ड म्हणजेच सोन्याचा अर्क. बिर्याणीच्या सुंदरतेत यामुळे अधिकच भर पडते.

ऑर्डरपूर्वी निवडा बिर्याणीचा तांदूळ

बिर्याणीत कुठल्या प्रकारचा तांदुळ वापरला जावा याकरता रेस्टॉरंटने ग्राहकांना याचा पर्यायही दिला आहे. ऑर्डरपूर्वी ग्राहकाला बिर्याणी राइस, किमा राइस व्हाइट आणि सेफ्रॉन राइसचा पर्यायही दिला जातो. तांदळाचा प्रकार निवडल्यावरच बिर्याणी सादर करण्यात येते.

गोल्ड लीफ कबाब

थाळीत बिर्याणीसह काश्मीर लॅम्ब, दिल्ली चॉप्स, राजपूत चिकन कबाब, मुगलई कोफ्ता आणि मलाई चिकन रोस्टही मिळणार आहे. याचबरोबर बेबी पोटॅटो, उकडलेली अंडी, भाजलेले काजू, तेलात परतलेला कांदा, मिंट रायता आणि चटणीही देण्यात येते.

थाळीत 3 किलोचा भात

रेस्टॉरंटनुसार बिर्याणीत केवळ भाताचेच वजन 3 किलो राहते. हा भात एकटय़ाने खाणे अशक्य आहे. बिर्याणीची ऑर्डर संबंधिताला किमान 45 मिनिटांपूर्वी द्यावी लागते, तरच ती उपलब्ध होऊ शकते.

Related Stories

रक्षाबंधनच्या दिवशी हरियाणाच्या 9 जिल्ह्यात सुरू होणार ‘महिला कॉलेज’

pradnya p

‘रिलायन्स’ची 150 अब्ज डॉलर्सवर झेप

Patil_p

वादग्रस्त अधिकाऱयाला पश्चिम बंगालमध्ये बढती

Patil_p

बेहमई सामूहिक हत्या, 18 जानेवारीला निर्णय

Patil_p

पाकिस्तानी घुसखोराचा राजस्थानमध्ये खात्मा

Patil_p

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांना कोरोनाची लागण

pradnya p
error: Content is protected !!