तरुण भारत

मोदींना उद्देशून ममतादीदींची वादग्रस्त टिप्पणी

देशातील सर्वात मोठे दंगलखोर – ट्रम्प यांच्यापेक्षाही मोठा पराभव होणार

वृत्तसंस्था/ शाहगंज

Advertisements

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वाप्युद्ध चिघळू लागले आहे. तृणमूल अध्यक्षा तसेच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तुलना करत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. ममतांच्या या सभेदरम्यान क्रिकेटपटू मनोज तिवारी आणि बंगाली अभिनेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मोदींना लक्ष्य करत त्यांना ‘सर्वात मोठे दंगलखोर’ संबोधिले आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही मोठा पराभव होणार असल्याचे म्हटले आहे. शाहगंजमध्ये सभेला संबोधित करताना ममतादीदींनी मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देशभरात असत्य आणि द्वेष फैलावत असल्याचा आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीत गोलरक्षक

मोदींना ट्रम्प यांच्यापेक्षाही मोठा झटका बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत मी गोलरक्षक राहणार असून भाजपचा एकही गोल होऊ देणार नाही. सर्व शॉर्ट गोलपोस्टच्या वरून जाणार असल्याचे ममतांनी म्हटले आहे. कोळसा घोटाळय़ाप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची सीबीआयने केलेल्या चौकशीप्रकरणी ममतांनी निंदा केली आहे. हा प्रकार महिलांचा अपमान करणारा होता, असा दावा ममतांनी केला आहे.

Related Stories

महाराष्ट्र : कोरोनाबाधितांनी ओलांडला 20.60 लाखांचा टप्पा

Rohan_P

पालघर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

Rohan_P

भयावह रुग्णवाढ : देशात 24 तासात 2.61 लाख बाधित

datta jadhav

डोक्यापासून पायापर्यंत टॅटूच टॅटू

Patil_p

विजयन सरकारकडून शिष्टाचाराचा भंग

Patil_p

म्हैसूरमधील ज्युबिलीयंट फार्मा कंपनी हॉटस्पॉट

Patil_p
error: Content is protected !!