तरुण भारत

कतार ओपनमधून हॅलेपची माघार

वृत्तसंस्था/ पॅरिस

जागतिक तिसऱया मानांकित सिमोना हॅलेपने पुढील आठवडय़ात होणाऱया कतार ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत हॅलेपला सेरेना विल्यम्सने उपांत्यपूर्व फेरीत हरविले होते. ‘दोहामधील स्पर्धेतून माघारीचा निर्णय मला घ्यावा लागला. पण पुढील वर्षी मी तेथे निश्चितपणे खेळेन,’ असे तिने म्हटल्याचे सांगण्यात आले. 1 ते 6 मार्च या कालावधीत होणाऱया या स्पर्धेतून माघार घेण्याच्या निर्णयाचे कारण मात्र तिने स्पष्ट केले नाही. हॅलेपशिवाय ऍश्ले बार्टी, सोफिया केनिन यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. हॅलेपने 2018 पेंच ओपन व 2019 मधील विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या आहेत.

Related Stories

मुंबई सिटीचा ईस्ट बंगालवर दिमाखदार विजय

Patil_p

एफ-वन चालक गॅस्ली कोरोनाबाधित

Patil_p

गावसकर म्हणतात षटकात दोन बाऊन्सर्सची परवानगी द्या!

Patil_p

भारताचे आणखी तीन धावपटू ऑलिंपिकसाठी पात्र

Patil_p

जपानचा केन्टो मोमोटा अपघातात जखमी

Patil_p

टाटा ओपनमध्ये भारताच्या रामकुमार रामनाथन, अर्जुन कढे यांचे आव्हान संपुष्टात

Patil_p
error: Content is protected !!