तरुण भारत

रायपाटण ग्रामीण रूग्णालयाची वीज कापली!

  वार्ताहर     /     राजापूर  

तालुक्यातील रायपाटण ग्रामीण रूग्णालयाने वीजबिल न भरल्याने महावितरणने मंगळवारी रूग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे गोंधळ उडाला. दरम्यान आमदार राजन साळवी यांनी हा वीजपुरवठा पुरवठा पूर्ववत करण्यास महावितरण कंपनीला भाग पाडले. अत्यावश्यक सेवा असलेल्या रूग्णालयाचा वीजपुरवठा तोडल्याने रायपाटण परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisements

रायपाटण ग्रामीण रूग्णालयाचे गेल्या काही महिन्यांचे वीजबिल भरण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्युत वितरण विभागाकडून मंगळ्वारी सायंकाळी 6 वा. रूग्णालयाचा वीजपुरवठा तोडण्यात आला होता. तालुक्याच्या पूर्व परिसरातील सुमारे 35 ते 40 गावांसाठी कार्यरत असलेले रायपाटण ग्रामीण रूग्णालय या भागासाठी महत्वाचे  असताना महावितरण विभागाने या रूग्णालयाचा वीजपुरवठाच खंडित केला.

रुग्णालयाचा वीज पुरवठा तोडल्याचे समजताच रायपाटणमधील शिवसेना शाखाप्रमुख महेश गांगण, भाजपाचे कार्यकर्ते प्रसाद पळसुलेदेसाई, ग्रामपंचायत सदस्य नीलेश चांदे, कुणाल गांगण आदींनी थेट ग्रामीण रूग्णालय गाठले व शहानिशा केली. यावेळी रूग्णालयासह परिसरात अंधाराचे साम्राज्य दिसताच त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, विद्युत वितरणच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आमदार राजन साळवी यांनाही या बाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर आमदार साळवींनी खंडित पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले व रात्री 10च्या सुमारास तो सुरू झाला. वीजबिल थकले म्हणून रुग्णालयाचा पुरवठा खंडित होणे, हा संतापजनक प्रकार असल्याची संतप्त भावना रायपाटण परिसरात व्यक्त होत आहे.

1 लाख 20 हजाराच्या आसपास आले वीजबिल

या बाबत रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, मागील काही महिने बिलेच मिळाली नव्हती. त्यानंतर बील आले ते 1 लाख 20 हजाराच्या आसपास आहे. रुग्णालयाला येणारा निधी 22 हजार एवढाच असल्याने या रकमेत हे बील भरणे शक्य नव्हते. यासाठी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू होता. मात्र रुग्णालयाचा पुरवठा खंडित केल्याची माहिती रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील लिपिक पाटील यांनी दिली. यापुढे अत्यावश्यक सेवांचा वीज पुरवठा खंडित न होण्यासाठी शासनाने धोरण ठरवणे गरजेचे बनले आहे.

Related Stories

पर्यटन व्यावसायिकांना उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा डाव!

NIKHIL_N

दापोलीतील 15 डिसेंबरला होणारी ग्रा. पं. सरपंच आरक्षण सोडत स्थगित

Abhijeet Shinde

‘भारतबंद’बाबत जिह्यात संभ्रम

Patil_p

अज्ञाताने रिक्षासह तीन दुचाकी जाळल्या

Patil_p

वेंगुर्ले राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे नवाबाग येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

Ganeshprasad Gogate

बिबटय़ाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

Patil_p
error: Content is protected !!