तरुण भारत

देशात 16,738 नवीन कोरोनाबाधित; 138 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासात 16 हजार 738 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 138 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 10 लाख 46 हजार 914 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 56 हजार 014 एवढी आहे. आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 163 जणांना लस देण्यात आली आहे. 

Advertisements


बुधवारी दिवसभरात 11,799 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 01 लाख 51 हजार 708 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 07 लाख 38 हजार 501 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


आतापर्यंत देशात 21 कोटी 38 लाख 29 हजार 658 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 93 हजार 383 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.24 फेब्रुवारी 2021) एका दिवसात करण्यात आल्या. 

Related Stories

अमरिंदरसिंग यांची भाजपशी चर्चा

Patil_p

एअर इंडियाच्या लिलावाला 30 जूनपर्यंत मुदतवाढ

datta jadhav

पुढील 12 तासात चक्रीवादळाचा धोका

datta jadhav

केंद्र सरकारकडून ‘ऑफसेट’ पॉलिसी रद्द

datta jadhav

कोविशिल्डनंतर कोवॅक्सिननेही केली लसीच्या दरात कपात

Rohan_P

पेगॅसस प्रकरणी आज आदेश देणार

Patil_p
error: Content is protected !!