तरुण भारत

दिलीप बिल्डकॉनला राज्यातील महामार्ग विकासाचे कंत्राट

बेंगळूर : पायाभूत सुविधा विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया दिलीप बिल्डकॉनला कर्नाटकातील महामार्ग विकासाचे 1 हजार 278 कोटींचे कंत्राट मिळाले आहे. भारतमाला योजनेंतर्गत सदरचा प्रकल्प राबवला जाणार असून दोड्डबळळापूर बायपास ते होसकोटे एनएच 648 महामार्गाचा विकास केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सदरचे कंत्राट दिलीप बिल्डकॉनला दिले गेले आहे. दोन वर्षात काम पूर्ण करायचे असून पहिल्या वर्षात हाताळणी व देखभालकरिता 3 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. महामार्गाच्या विकासानंतर प्रवासी व मालवाहतूक आणखी सुलभ होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

कर्नाटकातील भाजप आमदारांची पक्षातील आमदाराविरोधात स्वाक्षरी मोहीम

Abhijeet Shinde

मंत्री, खासदारांसाठी नव्या कार खरेदीला हिरवा कंदील

Amit Kulkarni

जेडीएस पोटनिवडणूक लढविणार नाही : माजी पंतप्रधान देवेगौडा

Abhijeet Shinde

कर्नाटक: राज्य सरकारने कोरोना मृतांची संख्या लपवली : काँग्रेस

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री अनलॉकबाबत एक-दोन दिवसात निर्णय घेतील: उपमुख्यमंत्री

Abhijeet Shinde

१४ दिवस लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करा : कोविड सल्लागार समिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!