तरुण भारत

बाळेपुंद्री खुर्द बाजारपेठ, बसस्थानक परिसर ग्रा.पं. सदस्यांनी केला स्वच्छ

वार्ताहर / बाळेकुंद्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोहीम अंतर्गत बाळेपुंद्री खुर्द येथील नवनिर्वाचित सदस्य व अध्यक्ष, ग्रा.पं.चे अधिकारी व कर्मचाऱयांसह युवक मंडळानेही स्वच्छता अभियान मोहीम राबविली.रविवारी सुटीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर गावच्या बसस्थानकाजवळ बाजारपेठेत पसरलेला कचरा श्रमदानातून स्वच्छ केला. प्रत्येक महिण्याच्या शेवटच्या रविवारी गावचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.

Advertisements

सदस्य, युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचे तसेच केलेल्या कार्याचे समस्त ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत असून श्रमदानातून अथवा जेसीबीने स्वच्छ करण्यात यावे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बाळेपुंद्री खुर्द येथील बसस्थानकाजवळ असलेल्या भाजीपाला विक्री करणाऱया व्यापाऱयांनी बाजारपेठेत कचऱयाचा ढीग केला होता. तसेच बाजारपेठेतील जमिनीचे सपाटीकरण, तसेच वायुसेनेच्या भिंतीला लागून जवळच्या वसाहतीतील तसेच कॉलनीतील नागरिकांनी कचरा टाकल्याने ढीग पडला होता. परिणामी पावसामुळे कचरा कुजून दुर्गंधी पसरत होती. बसस्थानकात उभ्या असणाऱया प्रवाशांना व विद्यार्थ्यांना नाक मुठीत धरूनच राहावे लागत होते. या ठिकाणी टाकण्यात येणारा कचरा डोकेदुखीचा ठरला होता. रविवारी सकाळी बाळेपुंद्री ग्रा.पं. अध्यक्षा रेणुका करविनकोप्प, उपाध्यक्ष पद्मा कोला, पीडीओ वासूदेव यांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाने कचऱयाची विल्हेवाट लावली. ग्रा. पं. माजी अध्यक्ष प्रशांत जाधव, युवराज जाधव, शिक्षक भरत कडोलकर, सदस्य शांत चंदगडकर, संजू पाटील, राम भागनावर, उदय भागन्नावर, मलिकार्जुन करविनकोप्प, संतोष चिक्कनगौडर, शिवानंद पुंभार, ईरान्ना चौबारी, लक्ष्मण कुरबर, विठ्ठल भागन्नावर व युवा कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते.

Related Stories

बेकायदा दारूसाठा बहाद्दरवाडी येथे जप्त

Amit Kulkarni

औद्योगिक कामगारांची पोलिसांकडून अडवणूक

Amit Kulkarni

बिजगर्णी महालक्ष्मी मंदिराचा स्लॅबभरणी कार्यक्रम उत्साहात

Amit Kulkarni

गनिमी काव्याने हदनाळमध्ये फडकवला भगवा!

Amit Kulkarni

मनपा योजनांसाठी यंदाही निधी नामंजूर

Amit Kulkarni

बोगस रेशनकार्ड सर्व्हेला वेग

Patil_p
error: Content is protected !!