तरुण भारत

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची तयारी

सामान्यज्ञान परीक्षेत एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग : खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून आयोजन

प्रतिनिधी / खानापूर

Advertisements

आजघडीला कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये यशासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी असते. या ग्रामीण प्रतिभेला शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षांना संपूर्ण तयारीनिशी सामोरे जाण्याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन झाल्यास शासकीय व अन्य बँकिंगसारख्या नोकऱयांमधील ग्रामीण तरुण-तरुणींचा टक्का वाढू शकतो. त्यासाठी प्रयत्नामध्ये सातत्य ठेवून नियमित सराव केल्यास हमखास यश मिळवता येते, असे प्रतिपादन भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी केले. येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे उद्घाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तालुका पंचायत माजी सदस्य नारायण कापोलकर होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर, विठ्ठल गुरव, मरु पाटील, मोहन पाटील, सतीश पाटील, गोविंद पाटील, जोतिबा घाडी, एस. डी. पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना कारलगेकर म्हणाले, खानापूर तालुक्मयातील पालकांची मानसिकता बदललेली आहे. लहान मुली व तरुणींच्या उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सर्वच ठिकाणी मुलींचे यश ठळकपणे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक वातावरणाची आतापासूनच सवय व्हावी. त्यांना अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांच्या तयारीची माहिती मिळावी या हेतूने मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

अध्यक्ष नारायण कापोलकर म्हणाले, तालुक्मयातील धडपड शिक्षक मंचच्या शिक्षकांच्या मदतीने गेल्या 8 वर्षापासून स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तोंडओळख व्हावी, परीक्षेचे स्वरूप कळावे. प्राथमिक स्तरापासून स्पर्धा परीक्षांना पोषक अशी वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी या परीक्षेचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले.

प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात परीक्षा घेण्यात आल्या. प्राथमिक गटात 650 विद्यार्थ्यांनी तर माध्यमिक गटात चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कोरोनामुळे सामाजिक अंतर, मास्क, सॅनीटायझर व थर्मल स्क्रीनिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरळीतपणे परीक्षा घेण्यात आली. याकामी धडपड शिक्षक मंच व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन व आभार वासुदेव चौगुले यांनी केले.

Related Stories

विद्युत खांबांमुळे रस्ता बनला अरुंद

Patil_p

पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल

Amit Kulkarni

चाकूहल्ल्यात मारुतीनगरचा तरुण जखमी

Patil_p

बेळगावचे सांबरा विमानतळ उड्डाणासाठी सज्ज

Rohan_P

शारदोत्सव महिला सोसायटीच्या स्पर्धेला प्रतिसाद

Amit Kulkarni

कक्केरीतील ‘त्या’ खुनामागे सासऱयाचाच हात असल्याचे उघडकीस

Patil_p
error: Content is protected !!