तरुण भारत

बिम्स हॉस्टेलच्या डेनेजचे पाणी अनेकांच्या घरात

प्रतिनिधी / बेळगाव

बिम्सच्या बॉईज हॉस्टेलच्या ड्रेनेजचे पाणी उघडय़ावर सोडल्यामुळे सदाशिवनगर येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा बिम्स प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून  हे पाणी योग्यप्रकारे डेनेजमध्येच सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

Advertisements

सिव्हिल हॉस्पिटलची हद्द सदाशिवनगर येथील रहिवाशांना लागून आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या कंपाऊंडला लागून अनेकांनी मोठे बंगले बांधले आहेत. त्या टोकालाच बिम्सचे बॉईज हॉस्टेल आहे. तेथील डेनेजचे पाणी उघडय़ावर सोडण्यात येत आहे.

ते पाणी अनेकांच्या घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून जीवन जगणे कठीण झाले आहे. तेव्हा तातडीने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

 बिम्स प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, या पाण्याविरोधात आंदोलन तसेच मनपाकडे तक्रार केली जाईल, असा इशारा दिला आहे. तेव्हा बिम्स प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

मुख्यमंत्री बोम्माई यांचे कन्नड भाषीकांना अधिक नोकऱ्या देण्याचे वचन

Sumit Tambekar

शास्त्रीनगर नाल्यातील गाळ काढल्याने समाधान

Amit Kulkarni

केएलईतर्फे वल्लभभाई पटेल जयंती साजरी

Patil_p

बेळगावातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Patil_p

शहराच्या पाणीपुरवठय़ात आज व्यत्यय

Amit Kulkarni

11 कैद्यांना कोरोना; हिंडलगा कारागृहात खळबळ

Rohan_P
error: Content is protected !!